मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज स्टार्स दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने आपल्या लग्नाच्या अफवांना ब्रेक लावला आहे. आपल्या लग्नाची तारीख या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 14 - 15 नोव्हेंबरला हे दोन दिल एक होणार आहेत. दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नाबद्दल लिहिताना म्हटलं होतं की, आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे. आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने 14 - 15 नोव्हेंबर 2018 मध्ये आमचं लग्न आहे. एवढ्या वर्षात आम्हा दोघांना जे प्रेम - आशिर्वाद मिळाला त्यासाठी आम्ही आभारी आहोत. आता सोशल मीडियावर देखील दीपिका - रणवीरच्या लग्नाची चर्चा आहे. या लग्नाबद्दल अनेक memes तयार करण्यात आले असून व्हायरल झाले आहेत. हे memes बघून तुम्हाला देखील खूप हसू येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बघायला गेलं तर बॉलिवूडमध्ये हे वर्ष लग्नांच वर्ष आहे. यावर्षी अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर्षी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीने आपल्या बेस्ट फ्रेंडला जीवन साथी निवडण्याचा निर्णय घेतला. सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने आणि ग्लॅमरस लग्न केलं आहे. 


तर नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी सिक्रेट मॅरेज करून सोशल मीडियावर लग्नाची माहिती दिली. त्यांचा विवाह गुरूद्वारात अगदी जवळच्या व्यक्तीसोबत झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सेलेब्स आपल्या लग्नाला अगदी अनोख्या पद्धतीने साजरी करत आहे. आता बोलायचं झालं तर दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील खास क्षण साजरे करणार आहेत. इथे इतर लोकांचे लग्न कॉमन राहिली असताना या दोघांनी आपल्या लग्नाची घोषणा केली आणि हे लग्न अतिशय पारंपरिक पद्धतीने होणार असल्याची माहिती दिली. 


सोनम कपूरबद्दल बोलायचं झालं तर या दोघांनी आपल्या लग्नाचं कार्ड छापल्यानंर लवकरच मिस वरून मिसेस बनणार आहे. सोनम कपूरने आपल्या लग्नाची अनाऊंसमेंट लग्नाच्या एक आठवड्या अगोदर केली होती. मात्र दीपिका पदुकोणने ही माहिती लवकर ब्रेक केली.