आलिया - रणबीरच्या नात्यावर पूजा भट्ट बोलते की....
पूजा भट्ट म्हणते...
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या आलिया आणि रणबीर कपूरच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा आहे. अनेकदा रणबीर - आलिया एकत्र कार्यक्रमात दिसतात यामुळे या दोघांच्या नात्याला उधाण आलं आहे. नुकतीच आलिया रणबीरच्या फॅमिलीसोबत डिनरला गेली होती यामुळे यांच्या लग्नाची गोष्ट पुढे सरकत असल्याची देखील आता चर्चा आहे.
तसेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने आलिया आणि त्याच्यात काहीतरी खास नातं असल्याच मान्य केलं होतं. रणबीर - आलियाच्या नात्यावर रणबीरची ex girlfriend कतरिनाने देखील आपलं मत व्यक्त केलं होतं. तर करिनाने देखील मोठी बहिण म्हणून काही गोष्टी शेअर केल्या होत्या. असं सगळं असताना आता आलियाची मोठी बहिण पूजा भट्ट हिने देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
पूजा भट्ट बोलते की,
पूजा भट्टकडे जेव्हा आलियाच्या रिलेशनशिपबद्दल विचारणा केली तेव्हा ती म्हणाली की, तुम्हाला आलियाशीच याबाबतीत बोलायला हवं. तुम्ही माझ्याशी माझ्या पर्सनल लाईफबद्दल बोलू शकता. पण मी माझ्या बहिणीच्या पर्सनल लाईफबद्दल काहीच बोलू शकत नाही.