close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रणबीर - आलियाच्या नात्यावर कतरिनाची प्रतिक्रिया

काय म्हणाली कतरिना?

रणबीर - आलियाच्या नात्यावर कतरिनाची प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या शुटिंगदरम्यानच दोघांच्या अफेअरची चर्चा देखील रंगली. मात्र अद्याप या दोघांनीही आपल्या या नात्याबद्दल कोणतीही कबुली दिलेली नाही पण बॉलिवूडमध्ये देखील यावर जोरदार चर्चा रंगली आहे. करिनाच्या पाठोपाठ आता कतरीनाने देखील या दोघांच्या नात्याबाबत खास टिपणी केली आहे. काही वेळापूर्वी कतरीनाने या दोघांबाबत इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. 

काय आहे कतरिनाच्या इंस्टा स्टोरीमध्ये 

कतरिनाच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तेव्हाच विश्वास बसेल जेव्हा तुम्ही स्वतः ते वाचाल. या स्टोरीत तिने कुणाचा उल्लेख केलेला नाही पण असं म्हटलं जातंय की ती स्टोरी रणबीर आणि आलियासाठी आहे. 

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर एकमेकांसोबत नात्यात राहिले आहेत. तसेच आलिया भट्ट आणि कतरीना देखील एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड राहिल्या आहेत. कतरिना आणि आलिया या दोघींना नेहा धूपियाच्या वोग बीएफएफच्या शोमध्ये एकत्र दिसले. 

रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडने देखील दिली कबुली 

दीपिका पादूकोण आणि रणबीर कपूर हे जवळपास दोन वर्ष नात्यात होते... त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं... पण या दोघांत आजही चांगली मैत्री आहे. त्यामुळेच दीपिकालाही आलिया - रणबीरच्या नात्याबद्दल माहीत आहे, असं रणबीर -दीपिकाच्या एका कॉमन फ्रेंडनं म्हटलंय.

या कॉमन फ्रेंडच्या म्हणण्यानुसार, रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात... त्यामुळेच रणबीरनं दीपिकासमोर आपल्या नव्या नात्याबद्दल मन मोकळं केलंय. दीपिकाला जेव्हा रणबीर-आलियाच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा तीदेखील या दोघांसाठी आनंदी होती.