मुंबई : आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या जाण्यानंतर माणूस खूप स्तब्ध होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूरने 24 फेब्रुवारीला आपल्या अगदी जवळची मैत्रिण, मेन्टॉर श्रीदेवीला गमावला. दुबईच्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला. जान्हवी आणि खुशीवर अगदी अनपेक्षितपणे आघात झाल्यामुळे त्या यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. 


असं होतं टीम धडकचं शेड्युल 


जान्हवी आणि इशाने पुन्हा एकदा शुटिंगसाठी बांद्रामध्ये दिसले. पुढील काही दिवसांसाठी हे दोघे धडक या सिनेमाचं रोमँटिक सीन शुट करणार आहेत. त्यानंतर हे सगळजण इंटरवल नंतरची स्टोरी शुट करण्यासाठी कोलकाताला रवाना जाणार आहेत. डिसेंबर 2017 पर्यंत धडक या सिनेमाचा फस्ट हाफ शूट केला आहे. हे शूट मुंबई आणि राजस्थान ठिकाणी करण्यात आलं आहे. 


काय म्हणाली टीम धडक 


या सगळ्या ठिकाणी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर अगदी आनंदाने होती. मात्र श्रीदेवीच्या निधनानंतर साऱ्याच गोष्टी थोड्या कठीण होत्या. जान्हवीप्रमाणे टीम धडक देखील या धक्क्यातून सावरलेली नाही. याबाबतीत स्पॉटबॉय डॉट कॉमने टीम धडकशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटलं की, जान्हवी खऱ्या अर्थाने प्रोफेशनल, ब्रेव आणि अमेझिंग आहे. हे तीन शब्द जान्हवीबाबत क्रू मेंबर्सनी जान्हवीसाठी उद्गारले.