वादानंतरही `पद्मावत`चा तिकीटांमधून डल्ला, किंमत पाहून हैराण व्हाल
संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावरून सध्या जोरदार वाद सुरु आहे.
मुंबई : संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावरून सध्या जोरदार वाद सुरु आहे. या चित्रपटाच्या विरोधात राजपूत करणी सेना देशभरामध्ये आंदोलन करत आहे. एकीकडे पद्मावत चित्रपटाला विरोध सुरु असतानाच अनेकजण चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहेत. पण हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर पहिले तिकीटांचे दर पाहून जा.
दिल्लीतल्या एका चित्रपटगृहामध्ये पद्मावत चित्रपटाचं एक तिकीट तब्बल २,४०० रुपयांना मिळत आहे. तर मुंबईतही चित्रपटाच्या तिकीटाचे दरही चढेच आहेत. परळच्या फिनिक्स मॉलमधल्या चित्रपटगृहामध्ये पद्मावतचे दर ९०० रुपयांपर्यंत आहेत. ठाण्याच्या व्हिवियानामध्ये पद्मावतच्या एका तिकीटाचे दर ४०० रुपयांपर्यंत आहेत. नरिमन पॉईंटच्या आयनॉक्स लासरप्लेक्समध्येतर संध्याकाळच्या शोचं तिकीट तब्बल १५५० रुपये आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही पद्मावतच्या एका तिकीटाचे दर ४०० ते ६०० रुपयांपर्यंत आहेत.
संजय लीला भन्सालींचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २५ तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण राणी पद्मावतीच्या, रणवीर सिंग अल्लाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर शाहीद कपूरही या चित्रपटात आहे.