मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. हाती काम नसल्यामुळे या मजुरांनी आपल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतल. सुरवातीला हे मजूर कामगार पायी, सायकलीवर आपल्या गावी पोहोचले. या दरम्यान अनेक मजुरांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे कामगारांसाठी रेल्वे मंत्रालयानं त्यांना आपल्या राज्यात पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली. त्याप्रमाने सोनुचे देखील या कामात मोठे योगदान लाभले आहे. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता सोनू सुदला 'पद्म विभूषण' पुरस्कार देवून सन्मानित करावं अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. एका युझरने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत सोनूला 'पद्म विभूषण' पुरस्कार देवून सन्मानित करण्याची मागणी केली आहे. 



'या महामारीच्या संकटात सोनूने श्रमिकांसाठी फार महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यामुळे त्याला पद्म विभूषण द्या.' सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी याचे समर्थन देखील केले आहे. या ट्विटला सोनूने रीट्विट देखील केले आहे. 


'आज आपल्या राज्यात सुखरूप परतलेल्या सर्व मजुरांकडून मिळालेल्या शुभेच्छा माझ्यासाठी पुरस्कार आहे.' असं सोनू म्हणाला. मजुरांना आपल्या राज्यात परत पाठवण्यासाठी अभिनेता सोनु सुदने फार मोठे योगदान दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर मजुरांना केलेल्या मदतीमुळे बिहारमधील सिवान येथे सोनूचा चक्क पुतळा उभा करणार असल्याची चर्चा रंगत आहे.