मुंबई : मैत्रिणीला आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगतो. आयुष्यातील चांगल्या वाईट परिस्थितीत आपल्यासोबत मित्र असतात. पण एका प्रसिद्ध गायकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जीव जडला आणि त्यांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली. हा गायक दुसरा तिसरा कोणी नाही, तर गायक हिमेश रेशमिया आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केलेली सोनिया हिमेशची पहिली पत्नी कोमलची खूप चांगली मैत्रीण होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमेश आणि कोमलच्या बिल्डिंगमध्ये सोनिया देखील राहायची. हिमेशच्या घरी कायम यायची. दोघांची पहिली भेटही कोमलनेच केली होती, पुढे जाऊन त्याचं मैत्रिणीमुळे संसाराचा नाश होईल, याची कल्पना देखील कोमलला नव्हती. 


हिमेश आणि सोनियाने 2006 मध्येच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. काही दिवसांनी पती आणि मैत्रिणीच्या नात्याबद्दल कोमलला चाहूल लागली. त्यानंतर हिमेशने 22 वर्षांचा संसार मोडत कोमलसोबत घटस्फोट घेतला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


2017 साली हिमेश आणि कोमल विभक्त झाले. दोघांना एक मुलगा देखील आहे. हिमेश आणि कोमलचे मार्ग कायमचे वेगळे झाले. पण दोघेही मिळून मुलांचा सांभाळ करतात. 


त्यानंतर 12 वर्ष सोनियाला डेट केल्यानंतर अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 11 मे 2018 साली राहत्या घरी कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. 


आज हिमेश आणि सोनिया सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. सोनियाबद्दल सांगायचं झालं तर,  'किटी पार्टी', 'पिया का घर', 'कुसुम', 'कभी हा कभी ना', 'सती... द पॉवर ऑफ ट्रुथ', 'रिमिक्स', 'बाबुल की प्रार्थना', 'लव्ह यू जिंदगी', 'येस बॉस', 'जय गणेश' आणि 'जय हनुमान' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.