VIDEO : कीमोथेरेपीच्या आधी हिना खाननं लावली होती अवॉर्ड शोला हजेरी, रुग्णालयापर्यंतचा प्रवास पाहून चाहते भावूक
Hina Khan Went To Award Show Before Cemo : हिना खाननं कीमोथेरेपीच्या आधी लावली होती अवॉर्ड शोला हजेरी...
Hina Khan Went To Award Show Before Cemo : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. या विषयी तिनं सोशल मीडियावर माहिती दिली. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्यासोबत तिनं लोकांना तिच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती केली आहे. आता हिनानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आजारपणात देखील एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती. त्यासोबत खूप मोठी पोस्ट लिहिली आहे.
हिना खाननं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं की 'ही अवॉर्डची रात्र आहे, मला माझ्या कॅन्सरविषयी माहित होतं, पण मी अगदी सहजपणे काही झालेलं नाही सगळं ठीक असं करत त्याला नॉर्मलाइज करण्याचा निर्णय घेतला. ना फक्त स्वत: साठी पण, आपल्या सगळ्यांसाठी. हा तो दिवस होतो ज्यानं सगळं काही बदललं, ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण फेजची सुरुवात झाली होती. तर चला एक वचन देऊ या. आपण तेच होतो, ज्यात आपण विश्वास करतो. मी एका चॅलेन्जला एका संधीप्रमाणे घेतलं आहे. ज्यात ती स्वत: ला बदलू शकते. माझ्या टूलकिटमध्ये सगळ्यात पहिलं शस्त्र काही असेल तर ते पॉजिटिव्हिटी ठेवण्याचं मी निर्णय घेतला आहे. मी या गोष्टीनं स्वत: ला नॉर्मलाइज करण्याचा विचार केला आहे. माझ्यासाठी... माझं काम महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी ही प्रेरणा, उत्साह आणि कला खूप महत्त्वाची ठरते.'
पुढे हिना म्हणाली, 'मी झुकणार नाही. हा अवॉर्ड जो मला मिळाला आहे, तो अकदी कीमोची सुरुवात होण्याच्या आधीचा आहे. फक्त तिच एक माझी प्रेरणा नाही तर, खरंच सगळ्यांना विनंती करते की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणींना सोपं करा, त्यांना सामान्य दर्जा द्या. तेव्हाच तुम्ही तुमचं धैर्य साध्य करण्यास सुरुवात करा. मग ते कितीही कठीण असलं तरी देखील. कधी मागे वळून पाहू नका. कधीही काहीही करतानात आधीच स्वत: ला अपयशी ठरवू नका.'
हेही वाचा : 'माझ्यासोबत अभिनय करण्याचा प्रयत्न नकोच...' अमिताभ बच्चन यांना 'मिर्जापुर' फेम अभिनेत्यानं का दिली तंबी?
दरम्यान, त्यावर कमेंट करत दलजीतनं लिहिलं की तू जे काही सांगितलं त्यानं मी प्रेरित झाले आहे. मी ज्या ज्या गोष्टींचा सामना करते, ते आता एकदम छोट्या दिसू लागतात. तू नेहमीच सगळ्यांना प्रोत्साहीत करते. तू लवकरच ठीक होऊन अशाच अवॉर्ड शोमधून कमबॅक करशील आणि अवॉर्ड्स जिंकशील. त्यासोबत एकता कपूर मोनी रॉय, सुनीता राजवर, जूही परमार, क्षिति जोगसारख्या अनेक कलाकारांनी हिना खानला पाठिंबा दिला आहे.