`तुझ्यात जीव रंगला` मालिकेत होळीचा सण साजरा
होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. आपण साजर्या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे.
मुंबई : होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. आपण साजर्या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे.
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेतही होलीदहन करण्यात आले. यावेळी राणा आणि पाठकबाई यांनी गायकवाड घराण्यावर आलेली सर्व संकटे दूर व्हावीत अशी प्रार्थना यांनी केली.
सध्या या मालिकेत नवनवी वळणे येतायत. गायकवाड कुटुंबावर अनेक संकटे येतायत. या संकटाना राणा आणि पाठकबाई कसं तोंड देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.