थलैवासाठी काहीपण... `जेलर` पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना एका दिवसाची सुट्टी जाहीर
Jailer Release: `जेलर` या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्या ट्रेलरवर प्रेक्षकांनी कमेंट करत उत्सुक असल्याचे सांगितले असून ते पाहता ऑफिसमधून कर्मचाऱ्यांना सुट्टी घोषित केली आहे.
Jailer Release: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच गर्दी करतात. त्यातही आता जवळपास दोन वर्षांनी रजनीकांत यांचा नवा चित्रपट येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्षेचा डोंगर हा वाढतच आहे. त्यांच्या चाहत्यांचा आनंद पाहता चेन्नई आणि बंगळूरुमधील जवळपास सगळ्या ऑफिसला 10 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात आली आहे.
चित्रपटाच्या प्रोमोनं आधीच प्रेक्षकांचा उत्साह वाढवला होता. तर आता चित्रपट प्रदर्शनाला दोन दिवस उरले असताना हा आनंद गगनात मावेना असा झाला आहे. जशा प्रकारे चेन्नई आणि बंगळूरुमध्ये ऑफिसला सुट्टी दिल्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चांगली वाढ होईल. वेंकी रिव्ह्यूननुसार, जेलर हा चित्रपट 2023 मध्ये कोणत्याही भारतीय चित्रपटातील सगळ्यात जास्त प्रीमियर रेकॉर्ड करण्यात यशस्वी असु शकते असं म्हटले जाते. कथितपणे, परदेशात या चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगसाठी 10 कोटींची तिकिट विकली आहेत. नेल्सन दिलीप कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात रजनीकांत हे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. असं म्हटलं जातं की दिग्दर्शकानं संपूर्ण चित्रपट हा एका वेगळ्या पद्धतीनं बनवला आहे. तर नुकतीच स्क्रिनिंगला पोहोचलेल्या संपूर्ण टीमला हा चित्रपट पाहून प्रचंड आनंद झाल्याचे कळते.
हेही वाचा : 'मी गौरी साकारली म्हणून...', तृतीयपंथी म्हणत हिणवलं जाण्यावर सुष्मिता सेनचा पारा चढला
रजनीकांत यांच्या भूमिकेविषयी बोलाचं झालं तर त्याचे नाव टायगर मुथुवेल पांडियन असे आहे. टायगरचे दोन वेगवेगळे रूप पाहायला मिळाले. त्याच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की सर्वसाधारण व्यक्ती कशा प्रकारे तलवार आणि बंदूक घेऊन वाईट वृत्तीच्या लोकांशी लढतात. चित्रपटाच्या टीमविषयी पुढे बोलायचे झाले तर प्रियांका मोहन, शिवा राजकुमार, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवि, विनायकन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत मल्याळम अभिनेता मोहनलालला घेतले आहे.
रजनीकांत हे वयाच्या 72 व्या वर्षी देखील खूप अप्रतिम स्टंट करताना दिसत आहेत. या वयातही त्यांना इतका चांगला अभिनय आणि त्याचसोबत आयुष्य जगताना पाहून अनेकांना आनंद होतोय. रजनीकांत हे अभिनेता होण्याआधी बस कंडक्टर म्हणून काम करायचे. रजनीकांत हे जेलर आधी अन्नात्थे या चित्रपटात दिसले होते. त्या चित्रपटासाठी नयनतारा, खुशबू आणि कीर्ति सुरेश या अभिनेत्री दिसल्या होत्या.