वयाच्या 83 व्या वर्षी अभिनेता झाला बाबा; 29 वर्षांच्या प्रेयसीनं दिला बाळाला जन्म
Entertainment News : कलाजगतामध्ये अशी अनेक नाती आकारास येतात ज्याबद्दल इतरांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांच्या भुवया उंचावतात. सध्या कलाजगतातून अशाच एका नात्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
Al Pacino welcomes his first child : असं म्हणतात की प्रेमाला वयाच्या सीमा नसतात. किंबहुना प्रत्येकाच्या आयुष्यात प्रचंड प्रेम आणि आपली हक्काची माणसं असावीत असं नेहमीच म्हटलं जातं. अशाच एका प्रेमाच्या नात्यानं सध्या संपूर्ण कलाजगताच्या नजरा वळवल्या आहेत. कारण, एका गाजलेला अभिनेता चौथ्यांदा बाबा झाला आहे. सध्या सोशल मीडियावर याच अभिनेत्याची आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाची चर्चा सुरु आहे.
हा अभिनेता म्हणजे हॉलिवूड स्टार अल पॅसिनो. वयाच्या 83 व्या वर्षी त्यानं 29 वर्षीय प्रेयसी नूर अलफल्लाह हिच्यासोबतच्या नात्यात आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. या दोघांनाही मुलगा झाला असून, त्यांनी त्याचं ना रोमन ठेवलं आहे. त्यामुळं जगभरात आता त्याची ओळख रोमन पॅसिनो अशी सांगितली जाईल.
कोरोना काळापासून एकमेकांच्या संपर्कात...
2022 मध्ये पॅसिनो आणि नूर यांचं नातं जगासमोर आलं. सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना महामारीच्या काळापासूनच त्यांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली होती. अलफल्लाहनं युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न कॅलिफोर्नियाच्या सिमेमॅटिक स्कूल ऑफ आर्ट्समधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. University of California Los Angeles मधून तिनं फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षणही घेतल्याचं म्हटलं जात आहे.
एक चांगला पिता होण्यासाठी...
नूर आणि अल पॅसिनो यांच्या नात्याच्या चर्चा झाल्या. काही कार्यक्रमांना आणि काही ठिकाणी त्या दोघांनाही एकत्र पाहिलं गेलं. ज्यानंतर आता त्याच्या नात्यातील नव्या पाहुण्याची माहती चाहत्यांना मिळाली. दरम्यान, बऱ्याच वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या एका मुलाखतीत पॅसिनोनं आपल्या नजरेतून पालकत्वाचा मुद्दा मांडला होता.
हेसुद्धा वाचा : WTC Final च्या प्लेइंग इलेव्हनमून वगळलेल्या अश्विनच्या तोंडी निवृत्तीचे संकेत?
'मला कुठंतरी ठाऊक होतं की मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं नाहीये. मला त्यांची (मुलांची) साथ द्यायचीये. मला तीन मुलं आहेत. मी त्यांच्याप्रती जबाबदार असून, ते माझ्याच आयुष्याचा एक भाग आहेत', असं म्हणत त्यानं आपला विचार मांडला होता. एक चांगला वडिल होणं नेमकं कसं असतं याबाबत चर्चा करत आपल्या बालपणी वडिलांनी आईला एकटं सोडलं तसं मुळीच करायचं नाहीये, असं म्हटलं होतं.