हॉलीवूडचे कलाकार मुंबई डब्बेवाल्यांच्या भूमिकेत? वाचा काय आहे नक्की प्रकरण
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिंग्ज ऑफ पॉवर` मालिकेतील कलाकार मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर फोटो काढताना दिसले.
Lords of the Rings Hollywood Tour: आजकाल हॉलीवूडचे कलाकारही आपल्याला बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटांचे फॅन असलेले पाहायला मिळतात. मराठी आणि हिंदी सिनेमाही जगभर पाहिला जातो. द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्ज ऑफ पॉवर' ही सिरिज ओटीटीवर रिलीज होते आहे. जगभरातील चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिरिजच्या प्रमोशनसाठी या सिरिजमधील संपुर्ण स्टारकास्ट भारतात प्रमोशनसाठी आली होती. यावेळी त्यांनी खास मुंबईला भेट दिली.
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिंग्ज ऑफ पॉवर' मालिकेतील कलाकार मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर फोटो काढताना दिसले.
टायरो मुहाफिदीन (Tyro Muhafidin), नाझानिन बोनियाडी (Nazanin Boniadi), मॅक्सिम बाल्ड्री (Maxim Baldry), मार्केला काव्हाना (Markella Kavanaugh), सारा झ्वांगोबानी (Sarah Zwangobani), मेगन रिचर्ड्स (Megan Richards), एम्मा हॉर्व्हथ (Emma Horvath), लॉयड ओवेन (Loyd Owen), शोरनर जेडी पायने (Showrunners JD Payne), चार्ल्स एडवर्ड्स (Charles Edwards) आणि रॉबर्ट अरामयो (Robert Aramayo) या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या आणि आकर्षक पोशाखात दिसले.
एवढेच नाही तर या कलाकारांनी मुंबईतील डब्बावाल्यांसोबत मस्त वेळ घालवला आणि त्यांच्यासोबत फोटोजही काढले आणि त्याच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला. 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिंग्ज ऑफ पॉवर'च्या कलाकारांसह डब्बावाल्यांनीही गांधी टोप्या परिधान केल्या होत्या ज्यावर त्यांची नावे लिहिली होती. यावेळी हे सर्व कलाकार डब्बावाल्यांच्या वेशात खूप आनंदित आणि प्रभावित झाले.
या मालिकेचे दोन भाग 2 सप्टेंबर 2022 रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रसारित होणार आहेत. नुकताच या सिरिजचा मुंबईत प्रीमियर झाला. त्यात हृतिक रोशन आणि तमन्ना भाटिया देखील सहभागी झाले होते.
'द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्ज ऑफ पॉवर' चा मुंबई प्रीमियर हा एशिया पॅसिफिक प्रीमियर ग्लोबल टूरचा एक भाग होता.