मुंबई : हॉलिवूड स्टार सलमा हायक यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटात काम केलं आहे. अलिकडेच सलमाने 1995 साली रिलीज झालेल्या 'डेस्पराडो' या चित्रपटाच्या सेक्स सीनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा सेक्स सीन शूट करताना ती रडू लागली होती. सलमाने सांगितले की, जेव्हा तिला या रोलची ऑफर मिळाली तेव्हा तिला सिनेमात सेक्स सीन असणार हे माहित नव्हतं. पण जेव्हा काम सुरू झालं, तेव्हा तिला याबाबतची माहिती मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाचे दिग्दर्शक  रॉड्रिग्जला आपला भाऊ मानत असल्यामुळे हा सीन शूट करण्यास तीने होकार दिला असल्याचं सलमा म्हणाली. हा सीन शूट दरम्यान सलमा आणि अभिनेता अँटोनियो शिवाय फक्त दिग्दर्शक आणि त्यांची पत्नी उपस्थित होती जेणेकरुन सलमा कर्म्फटोबल राहू शकेल.


सलमाने सांगितले की, शूटिंग सुरू करताच ती रडू लागली. ती म्हणाली, ''मी या तिघांनाही सांगितलं की, मी हे करू शकणार नाही. मी घाबरले आहे. त्यावेळी मला अँटोनियोचीही भीती वाटत होती, पण नंतर तो माझा मित्र झाला. पण त्यावेळी तोही घाबरला. तो ही म्हणाला, जर तुम्ही अशा रडायला लागलात, तर मी हे शूट करू शकणार नाही. मला ही भीती वाटत आहे.


सलमा पुढे म्हणाली, ''जेव्हा सीन सुरू झाला तेव्हा माझी तब्येत खराब झाली होती, प्रत्येकजण मला हसवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी मी माझ्या वडिलांचा आणि भावाचा विचार करीत होते, जेव्हा ते हा सीन पाहतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल. लोकं हा सीन पाहून कसे रिअॅक्ट करतील. मुलाने असा सीन शूट केला तर त्याला कोणतीही अडचण येणार नाही, मात्र जर मुलगी असा सीन करत असेल तर, आई-वडिलांना वेगवेगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात.''


सिनेमानंतर वडील आणि भावाची प्रतिक्रिया
सलमाने सांगितलं की, जेव्हा त्याचा भाऊ आणि वडील एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते, तेव्हा त्या सीन दरम्यान ते थिएटरच्या बाहेर गेले होते आणि तो सीन संपल्यानंतर दोघंही परत आले.