Honar Sun Me Hya Gharchi Sachin Deshpande : गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठीवर सुरु झालेल्या पारू या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात जागा केली. काही दिवसातच मालिकेचा चाहता वर्ग खूप वाढला. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली. त्यापैकी एक म्हणजे सचिन देशपांडे. सचिन देशपांडे नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सचिननं त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सचिननं त्याच्या पत्नीसोबतचे लग्नाचे आणि त्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सचिननं कॅप्शन दिलं की "सरकार, झाली की 6 वर्ष पूर्ण... म्हणजे नवीन टर्मचं, पण एक वर्ष पूर्ण केलंय आपण, ते ही यशस्वी पणे, अशा अनेक टर्म माझं मत कायम तुम्हालाच पडणार आहे याची खात्री बाळगा. पण गेल्या 6 वर्षातलं हे वर्ष सगळ्यात कठीण होतं, एका कलाकाराशी लग्न करताना हा काळ आपल्या आयुष्यात येईल याची तुला कल्पना जरी असली, तरी तो काळ प्रत्यक्षात आल्यावर काय करायला हवं याची पूर्व तयारी करता येत नाही, पण तरीही तू मला या काळात जे काही सांभाळून घेतलस त्याला तोड नाही. तुझं निव्वळ असणंच मला इतका आत्मविश्वास देऊन जातं ना, तू आहेस म्हणून मी तरलोय. अशीच कायम माझ्या बरोबर रहा आणि अशा अनेक पंचवार्षिक योजना आपण एकत्र पूर्ण करत राहू. बाकी हे तुझ्यासाठी खास, अमुक माझं तमुक तुझं, जुनं माझं ताज तुझं, भूत माझा भविष्य तुझं, साधना माझी यश तुझं, आता जे काही आहे माझं, ते सारं सारं तुझं. माझ्या परमेश्वरातला 'प' ही तुझा आणि माझ्या श्रधेतलं स्थान ही तुझंच." दरम्यान, सचिनच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 



हेही वाचा : श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या


सचिनची पत्नी पियुषाविषयी बोलायचे झाले तर तिचे बालपण हे मिरजेत गेले. पियुषानं फायनान्स अॅण्ड मार्केटिंगमध्ये एमबीए केलं आहे. तिला एक लहान भाऊही आहे. तर सचिन आणि पियुषा यांना एक मुलगी आहे. सचिनविषयी बोलायचं झालं तर त्याला खरी लोकप्रियता ही 'होणार सून मी या घरची' मालिकेतून मिळाली आहे.