मुंबई : जवळपास अडीच वर्ष 'होणार सून मी या घरची' या मालिकेने मराठी कुटुंबातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. श्री- जान्हवी आणि सहा सासू या सर्व व्यक्तिरेखांची चर्चा तमाम प्रेक्षकांच्या घरात व्हायची. इतकंच काय तर श्री आणि जान्हवीचे प्रॉब्लेम्स देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. जान्हवीचा 'काहीही हां श्री' संवाद, तिचे बाळंतपण याविषयीचे भन्नाट विनोद सोशल मीडियावर बरेच गाजले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीचे प्रेम त्यांचे लग्न, सहा सासवा, समंसज बाबा, खाष्ट सासू अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या मालिकेचा प्रेक्षक आता पुन्हा आस्वाद घेऊ शकतात. 


लॉकडाऊनमुळे चित्रीकरण थांबलं असून प्रेक्षक नवीन मालिकांचे भाग पाहू शकत नाही आहेत म्हणून झी मराठी वाहिनीने जय मल्हार आणि स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेसोबतच होणार सून मी या घरची या लोकप्रिय मालिकेचं पुनःप्रक्षेपण करायचा निर्णय घेतला आहे. ही मालिका प्रेक्षक दुपारी १२ ते ३ या वेळेत पाहू शकतात.