मुंबई : रेगे अभिनेता आरोह वेलणकरचा नवा सिनेमा येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉस्टेल डेज असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमांत आपल्याला पार्थना बेहरे, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव पाहायला मिळणार आहे. या सिनेमांत हॉस्टेलची धम्माल दाखवण्यात आली आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं हे मत असतं की, हॉस्टेलचं आयुष्यच वेगळं आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांच एक वेगळं विश्व असतं. आणि त्या विश्वात ते रममाण असतात. 


त्याचप्रमाणे या ट्रेलरमध्ये हॉस्टेल डेजच्या पात्रांची ओळख करून देण्यात आलं आहे. त्यामुळे या सिनेमांत कॉलेज लाईफची धम्माल आहे हे नक्की. हा सिनेमा 12 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. 



आरोह वेलणकर रेगे या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. आरोह नुकताच लग्न बंधनात अडकलेला आहे. तसेच या सिनेमातील अभिनेत्री प्रार्थना बेहरे देखील नुकतीच लग्न करून हनीमुनला गेली असल्याची माहिती मिळाली होती. 


त्याचप्रमाणे या सिनेमातील एक गाणं कुणाल गांजावालाने गायलं आहे. संगीत अजय नाईकने दिलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अजय किशोर नाईकने केलं असून सुभाष बोरा आणि चंदन गेहलोत निर्माता आहेत.