मुंबई : सोशल मीडियावर चर्चिल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पटानी. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. दिशासोबतच टायगर श्रॉफचेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. जेव्हापासून बागी २मध्ये हे दोघं एकत्र दिसले होते. त्यानंतर यांच्या चाहत्यांची संख्याही झपाट्याने वाढली. दिशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते आणि सतत फोटोज पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी बिकीनीमधील तिचे फोटो व्हायरल झाले होते.