`गौरी तुला कधी...`, पत्नी विषयी विचारलेल्या `त्या` खासगी प्रश्नावर Shahrukh Khan म्हणाला...
शाहरुखला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) हा फक्त अभिनय आणि रोमान्स किंग म्हणून ओळखला जातो. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान (Shahrukh Khan's Wife Gauri Khan) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहरुखला बऱ्याचवेळा त्याचा आणि गौरीच्या रिलेशनशिपवर प्रश्न विचारण्यात येतात. अशा वेळी शाहरुख त्याच्या अंदाजात चाहत्यांना किंवा मग पत्रकारांना उत्तर देताना दिसतो. सध्या शाहरुखचा एका जुन्या मुलाखतीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी गौरी विषयी विचारलेल्या प्रश्नावर शाहरुख लाजत मजेशीर उत्तर देतो.
आणखी वाचा : Paparazzi नं राजू श्रीवास्तव यांच्याविषयी प्रश्न विचारताच Taapsee Pannu संतापली, म्हणाली '...बाजूला व्हा'
एका कार्यक्रमा दरम्यान, पत्रकारानं शाहरुखला गौरीबद्दल (Gauri Khan) प्रश्न विचारला की, 'तू स्वतः रोमन्टिक भूमिका साकारतोस, मात्र गौरी तुला कधी अनरोमन्टिक म्हणाली आहे का? तू रोमॅंटिक पती आहेस का?' हा प्रश्न ऐकल्यानंतर शाहरुख हसत म्हणाला, ‘या प्रश्नाचं उत्तर मी कस देऊ? मला खूप लाजल्यासारखं झालं आहे. मी एक चांगला साथीदार आहे, मी खुश ठेवू शकतो. मी दुसऱ्याचं पूर्ण शांतपणे ऐकून घेतो. मी दुसऱ्याला हसवू शकतो, मी इतकंच सांगू शकतो.' यानंतर अनेकांनी शाहरुखला गौरी संबंधीत प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर शाहरुख म्हणाला, ‘ या सगळ्या प्रश्नांची उत्तर देताना, मला खूप लाजल्यासारखं होत आहे' आणि त्यानंतर शाहरुखनं पुढे उत्तरं देणं टाळलं.
आणखी वाचा : आमिर खानच्या घरी लगीनघाई, फातिमा सना शेख म्हणाली, 'ही सगळ्यात गोड गोष्ट...'
आणखी वाचा : Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा
शाहरुख आणि गौरी यांची पहिली भेट दिल्लीत झाली. ते दोघं ही मुळचे दिल्लीचे आहेत. अभिनय क्षेत्रात काम करायचे म्हणून शाहरुख मुंबईत आला. शाहरुखनं सुरुवातीला मालिकामध्ये काम केले आणि नंतर चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली. शाहरुख आणि गौरी 1991 साली लग्न बंधनात अडकले. त्यांना तीन मुलं असून आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम असे आहे. (How Can I Answer Says Shahrukh Khan After Journalist Ask Him If Wife Gauri Ever Complain That he is not romantic)
आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक
गौरी ही फक्त शाहरुखची पत्नी म्हणून ओळखली जातं नाही तर ती स्वत: एक लोकप्रिय इंटेरिअर डिझायनर आहे. गौरीनं आता पर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटेरिअर डिझाइनींग केलं आहे. लवकरच गौरीचा एक शो आपल्याला पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये गौरी तिनं केलेल्या काही सेलिब्रिटींच्या इंटेरिअर डिझायनींविषयी दाखवणार आहे.