आमिर खानच्या घरी लगीनघाई, फातिमा सना शेख म्हणाली, 'ही सगळ्यात गोड गोष्ट...'

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Updated: Sep 23, 2022, 10:01 AM IST
आमिर खानच्या घरी लगीनघाई, फातिमा सना शेख म्हणाली, 'ही सगळ्यात गोड गोष्ट...' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Aarmi Khan) घरी लगीन घाई! आमिरची लेक आयरा (Ira Khan) आता सिंगल नाही. आयरानं बॉयफ्रेंडसोबतचं तिचं रिलेशनशिपला Next Level घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयरा लग्न बंधनात अडकणार आहे. आयरा आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूरचा (Ira Boyfriend Nupur)  साखरपुडा झाला आहे. हा साखरपुडा कोणत्याही साध्या पद्धतीनं नाही तर रोमांचक पद्धतीनं झालं आहे. आयरानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

आणखी वाचा : Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा

फेमस आयर्न मॅन इटली शोमध्ये नुपूर शिखरेनं गर्लफ्रेंड आयराला प्रपोज केलं होतं. व्हिडिओमध्ये फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे रेसच्या पोशाखात असून आयराच्या दिशेनं येताना दिसत आहे. तो आयराला किस करतो. मग नुपूर आयराला फिल्मी अंदाजात प्रपोज करत बॉक्समधून अंगठी काढतो आणि तू माझ्याशी लग्न करशील का असा प्रश्न विचारतो. नूपूरनं प्रपोमज केल्यानंतर आयरा खूश होते आणि लगेच ती हो बोलते. त्यानंतर आयरा पुन्हा एकदा नुपूरला किस करते.  

आणखी वाचा : ओम पुरी आणि रेखा यांचा हा Bold Scene पाहून, सेटवर असलेले सगळे झाले होते हैराण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'मराठी रॅप सुनने गुज्जू भी ...', तरुणीचा मराठमोळा रॅप सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; एकदा तुम्हीही ऐकाच

आयरा आणि नुपूरला पाहून तिथे उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवू लागतात. आयरा आणि नुपूरच्या सारखपुड्याचा हा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आयरा म्हणाली, 'Popeye: ती हो म्हणाली. आयरा: हाहाहा, मी हो म्हणाले.' सेलेब्स देखील आयराचे अभिनंदन करत आहेत. रोहमन शॉलनं या कपलला अभिनंदन केलं. त्याच वेळी, फातिमा सना शेख म्हणाली, 'मी पाहिलेली सगळ्यात गोड गोष्ट आहे. उफ्फ, नुपूर खूप फिल्मी.' टायगर श्रॉफची बहीण कृष्णा, हुमा कुरेशी, रिया चक्रवर्ती, सारा तेंडुलकर, हेजल कीच यांनीही आयरा-नुपूरचे अभिनंदन केले आहे. (Aamir Khan Daughter Ira Gets Engaged With Boyfriend Nupur Shikhare Shared Romantic Video Of Proposal Fatima Sana Shaikh Said This is the Sweetest Thing) 

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

Aamir Khan Daughter Ira Gets Engaged With Boyfriend Nupur Shikhare Shared Romantic Video Of Proposal Fatima Sana Shaikh Said This is the Sweetest Thing

आणखी वाचा : Birthday Kareena Kapoor Khan चा पण चर्चा मात्र मलायकाची, पाहा काय म्हणाले नेटकरी

आयरा आणि नुपूर 2020 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. हे दोघं सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात. आयरा आणि नुपूर हे अनेकांचं कपल गोल आहे. आयराच्या कुटुंबालाही नुपूर खूप आवडतो. आयरा आणि नुपूर एकत्र फिरायला जातात. दोघांनाही प्रवासाची आवड आहे. नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. आयरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी आयराने थिएटर डायरेक्टर म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र, आयराचा अजून बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा विचार नाही.