मुंबई : सिनेमात सहाय्यक अभिनेता म्हणून ओळख निर्माण केलेला अभिनेता चंकी पांडे यांचा आज 57 वा वाढदिवस आहे. 80 च्या दशकात त्यांनी यशस्वी सिनेमे दिले पण ते कधी प्रमुख अभिनेत्याच्या रुपात हिट ठरले नाही. हिंदी सिनेमा फ्लॉप ठरल्यावर चंकी पांडे यांनी बांग्लादेशी सिनेमा काम केलं आणि महत्वाचं म्हणजे ते तिथे हिट ठरले. त्यानंतर पुन्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी अक्षय कुमारला डान्स शिकवणाऱ्या चंकी पांडेंचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी ... चंकी पांडे आणि अक्षय कुमार यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं. तसेच हे दोघे एकाच डान्स क्लासमध्ये होते आणि चंकी पांडे यांनी अक्षयला डान्स करायला शिकवलं होतं. पण असं असलं तरीही त्यांना अक्षयसारखं यश मिळालं नाही. 


चंकी पांडे यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना 1987 मध्ये दिग्दर्शक पहलाज निहलानी यांच्या 'आग ही आग'मध्ये संधी दिली होती. पहलाज यांच्या पहिल्या भेटीचा उल्लेख करताना चंकी पांडे म्हणाले होते की, दिग्दर्शकांनी एका लग्नात नाड्याचा पायजमा घातला होता. लग्नात जेव्हा ते टॉयलेटला गेले तेव्हा त्यांच्या पायजम्याची नाडी सुटत नव्हती. तेव्हा दिग्दर्शकाने नाडी खोलण्यासाठी चंकी पांडे यांची मदत घेतली. तेव्हाच बोलता बोलता त्यांनी चंकी पांडे यांना त्यांचा आगामी सिनेमा ऑफर केला आणि तोच चंकी पांडे यांचा पहिला ठरला. 


चंकी पांडे यांनी 1988 मध्ये 'पाप की दुनिया' आणि 'खतरों के खिलाडी', 1990 मध्ये 'जहरीले',1992 मध्ये 'आंखे' सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. 1988 च्या लोकप्रिय 'तेजाब' सिनेमांत अनिल कपूरच्या मित्राची भूमिका साकारली. ज्या भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. पण अगदीच 90 च्या दशकात त्यांच करिअर संपलं. 


बॉलिवूड सिनेमातील करिअर संपल्यावर चंकी पांडे यांनी बांग्लादेशी सिनेमांकडे आपलं लक्ष वळवलं. स्थानिक भाषा येत नसताना देखील चंकी पांडे यांनी बांग्लादेश सिनेमा 'स्वामी केनो असामी', 'बेश कोरेची प्रेम कोरेची', 'मेयेरा ए मानुष' सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर पुन्हा त्यांनी बॉलिवूड प्रवेश केला.