Sara On Kareena Kapoor : सारा करिनाला छोटी आई का मानत नाही? अभिनेत्रीचा खुलासा
करीना कपूर खान आणि सारा अली खान या दोघीही चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत.
मुंबई : करीना कपूर खान आणि सारा अली खान या दोघीही चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत. करीना ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे, तर सारा अली खान ही सैफच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. सारा अली खान ही करीना कपूर खानची सावत्र मुलगी आहे. मात्र, सारा करिनाला कधीही छोटी आई म्हणत नाही. खुद्द सारा अली खानने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये याचा खुलासा केला आहे.
सारा अली खानने खुलासा केला
जेव्हा सारा अली खानला करण जोहरने त्याच्या कॉफी विथ करण शोमध्ये करीनाला छोटी आई म्हणण्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा साराने सांगितलं की, करीना कपूरने तिला सांगितलं की, तिची आधीपासूनच खूप प्रेमळ आई आहे. यामुळे साराने तिच्याशी मैत्रीण म्हणूनच रहावं, आणि आता आम्ही बेस्ट फ्रेंड बनलो आहोत.
यासोबतच साराने खुलासा केला होता की, तिचे वडील सैफ अली खान यांनाही करिनाला छोटी आई म्हणावं असं वाटत नाही. सारा अली खानने सांगितलं की पापा आणि करीना कपूर खानला अस्वस्थ झालेलं मला कधी पाहयचं नव्हतं.
सैफ अली खानने करीना कपूर खानसोबत दुसरं लग्न केलं आहे. यापूर्वी त्यांचं लग्न अमृता सिंगसोबत झालं होतं. सारा अली खान ही सैफ आणि अमृताची मुलगी आहे. केदारनाथ या चित्रपटातून सारा अली खानने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती दररोज हेडलाइन्स लुटत असते.
यासोबतच ती सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. याआधी सारा अली खानने 2021 मध्ये आलेल्या 'अतरंगी रे' या चित्रपटातून तिची चमक दाखवली आहे. तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.