डिंपल कपाडिया म्हणते, अक्षय कुमार `गे`
अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो `टॉयलेट - एक प्रेम कथा` या सिनेमामुळे. या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये अक्षय कुमार कायम वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो "टॉयलेट - एक प्रेम कथा" या सिनेमामुळे. या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये अक्षय कुमार कायम वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो.
अक्षय कुमार उत्तम अभिनेत्याबरोबरच तो चांगला पती आणि पिता देखील आहे. बॉलिवूडमध्ये अनेक जोड्यांपैकी अक्षय आणि ट्विंकलची जोडी खास वाटते. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आणि ट्विंकलविषयी विविध चर्चा रंगत आहेत. त्यातच आता आणखी एका चर्चेची भर पडली आहे. आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि भूमिकांद्वारे अनेकांना भुरळ पाडलेल्या खिलाजी कुमारला त्याच्या सासुबाई म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया काही वेगळेच समजत होत्या. अक्षय ‘गे’ आहे असा डिंपल यांचा समज होता.
एवढंच नाही तर ट्विंकलच्या एका पत्रकार मित्राने तिला अक्षय 'गे' असल्याचं सांगितलं होतं. ट्विंकलचा याचा धक्का बसला आणि तिने लगेच हा प्रकार डिंपल कपाडियाला सांगितला. त्यावेळी डिंपल यांनी ट्विंकलच्या म्हण्यावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे ज्यावेळी अक्षय कुमार ट्विंकलला लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला तेव्हा त्याच्यासमोर डिंपल कपाडिया यांनी एक अट ठेवली. अक्षय आणि ट्विंकलला लग्नाआधी एक वर्ष एकमेकांसोबत राहावं लागेल अशी ती अट होती. त्यानंतरच जर त्या दोघांमध्ये सर्वकाही ठीक राहिले तरच ते लग्न करु शकतात असेही डिंपल यांनी स्पष्ट केले होते.
आणि आता आपण पाहतोय या दोघांचा संसार आणि त्यांचं करिअर अतिशय उत्तम सुरू आहे.