गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी Hrithik Roshan नं खरेदी केलं इतक्या कोटींच घर? किंमत ऐकून बसेल धक्का
Hrithik Roshan and Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद एकत्र राहणार असल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या दोघांचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतं त्यांची जोडी आवडते तर कोणी आवडत नाही असं म्हणतात.
Hrithik Roshan and Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आणि अभिनेत्री सबा आझादच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात येते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वीच हृतिकचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात त्याच्या हातात गर्लफ्रेंड सबाची हिल्स दिसत होती. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी हृतिकला ट्रोल केले तर अनेकांनी हृतिकची स्तुती केली होती. दरम्यान, आता सबा आणि हृतिक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. आता अशी बातमी समोर आली आहे की हृतिकनं सबासोबत राहण्यासाठी मुंबईत एक आलिशान घर खरेदी केलं आहे.
हृतिकनं सबा आझादसाठी मुंबईत 100 कोटींचं घर विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे. या घरात हृतिक सबासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ’हॉलीवूड लाइफ’नं दिलेल्या माहितीनुसार लग्नाआधी हृतिक सबा आझादबरोबर राहण्यासाठी नवीन घर विकत घेतलं आहे. इतकंच काय तर हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. हृतिक आणि सबा एकत्र राहत असल्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघांनी एकत्र राहण्याचा प्लॅन केला अशा बातम्या आल्या होत्या.
'इंडिया टुडे'नं दिलेल्या माहितीनुसार, हृतिकनं एक नाही तर दोन फ्लॅट घेतले आहेत. हे दोन्ही फ्लॅट बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला आहेत. मुंबईतील महागड्या परिसरात आहे. त्यांनी ज्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं आहे त्याचं नाव मन्नत आहे. सध्या त्यांच्या या घराचं रिनोव्हेशन सुरु आहे.
दरम्यान, हृतिकनं या आधी सुरु असलेल्या या सगळ्या चर्चांवर हे खोटं असल्याचं म्हटलं होतं. यात कोणतही सत्य नाही. ही एक सेलिब्रिटी आहे म्हणून लोक काहीही चर्चा करतात. चुकीची माहिती पसरवली जाते. तर आता पुन्हा एकदा हृतिक आणि सबाच्या लिव्ह इन मध्ये राहण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा : चौथीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी...; रेल्वेच्या अशुद्ध मराठीत सुचनांवरून अभिनेत्यानं सुनावलं
दरम्यान, हृतिक रोशनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच फाइटर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दीपिका आणि हृतिक पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सगळ्यात शेवटी हृतिक सैफ अली खानसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसला होता.