Hrithik Roshan and Saba Azad : गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद हे दोघं त्यांच्या रिलेशनशिपमुळे सतत चर्चेत असतात. ते दोघं पब्लिक प्लेसमध्ये देखील एकत्र दिसतात. इतकंच नाही तर ते दोघं सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकताच हृतिक आणि सबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत हृतिकची दोघी मुलं देखील स्पॉट करण्यात आली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिक आणि सबाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत हृतिक आणि सबा एका रेस्टॉरंटमधून बाहेर आल्याचे दिसत आहे. तर त्या दोघांनी खूप कॅज्युअल कपडे परिधान केले आहेत. हृतिकनं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि ग्रे रंगाचं जॅकेट, खाकी ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे. सबानं काळ्या रंगाचं क्रॉप टॉप परिधान केलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला हृतिकची मुलं बाहेर पडतात आणि गाडीत बसतात. तर त्यानंतर हृतिक आणि सबा हे दोघं बाहेर पडतात. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हृतिक आणि सबाच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, हृतिक आणि त्याची तिनं मुलं. दुसरा नेटकरी म्हणाला, मला वाटलं हृतिकची ती मुलगी आहे. तर काही नेटकऱ्यांनी हृतिक आणि सबाची जोडी पसंत असल्याचे म्हटलं आहे. एक नेटकरी म्हणाला, ते दोघं एकत्र किती सुंदर दिसतात. दुसरा नेटकरी म्हणाला, त्यांची जोडी सुंदर आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, हृतिकला ही मुलगी सूट करत नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : Urfi ला पाहतच राहिल्या झिनत अमान... क्षणात बदलले त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव


दरम्यान, हृतिक रोशन लवकरच फाइटर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाशिवाय हृतिक लवकरच 'वॉर' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. शाहरुखच्या पठाण या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सिद्धार्थ आनंद आणखी एक अॅक्शन फिल्म बनवणार आहे. त्या चित्रपटात शाहरुख, हृतिक आणि सलमान एकत्र असणार असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर हृतिक त्याचे वडील राकेश रोशन यांच्या 'क्रिश 4' मध्ये दिसणार आहे