मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेकदा अनेकांच्या जोड्या तुटताना आपण पाहिल्या आहेत. धुमधडाक्यात झालेलं लग्न वास्तवातही फिल्मी स्टाईलने मोडलेली आपल्या दिसून येतात. मात्र जसा सिनेमात एखादा क्लायमॅक्स येऊन कथेला वेगळं वळण निर्माण करतो. तसंच काहीसं सध्या दृतिक आणि सुझानच्या आयुष्यात घडलंय..पाहुया नेमकं काय झालं सुझान आणि हृतिकच्या आयुष्यात.


'कहो ना प्यार है'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2000 साली हृतिक रोशनने 'कहो ना प्यार है', या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घेतली, आणि जणू 'कहो ना प्यार है'ची विचारणाही त्याने सुझानला याच वर्षात केली. एका सिग्नलला पहिल्यांदाच सुझान आणि हृतिकची नजरानजर झाली.


कार्यक्रमाला सुझान आवर्जून हजर असायची


हृतिकच्या याच नजरेने घायाळ झालेल्या सुझानशी डिसेंबर 2000 साली हृतिकने काही मोजक्या नातेवाईंकांसह लग्नाची गाठ बांधली. त्यानंतर हृतिकसोबत बॉलिवूडच्या प्रत्येक कार्यक्रमाला सुझान आवर्जून हजर असायची...मात्र सुखा समाधानाने नांदू लागलेल्या हृतिकच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि हृतिक-सुझानमध्ये अनेक खटके उडू लागले. बार्बरा मोरीशी हृतिकची असलेली जवळीक हे त्याला कारण ठरलं.


14 वर्षांनी हा संसार विभक्त


जवळपास 14 वर्षांनी हा संसार विभक्त झाला. त्यावेळी कुटुंबियांना हा निर्णय घेताना खूप कठिण जातं असल्याचं प्रामाणिक मत हृतिकने यावेऴी व्यक्त केलं होतं. त्यानंतर जरी सुझान आणि हृतिक रोशन वेगवेगळे झाले असले तरीही आपल्या मुलांच्या संगोपनात ते कुठेही कमी पडले नाहीत. 


हृतिकच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर शुभेच्छा


दोघांनीही आपल्या मुलांची जबाबदारी त्यांनी तेवढ्याच जिद्दीने पेलली. इतकंच नाही तर घटस्फोटांनंतरही त्यांनी आपले कौटुंबिक संबंध पहिल्यासारखेच जपले. कंगना रानोट सोबत सुरु असलेल्या वादा दरम्यान सुझानने हृतिकची बाजू उचलून धरत त्याला साथ दिली होती. त्यातच हृतिकच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आणि माझ्या आयुष्यात कायम आनंद निर्माण केला.


हृतिक आणि सुझान एकत्र येणार


वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असं जाहीर सुझानने मत मांडलं. तिथूनच पुन्हा एकदा हृतिक आणि सुझान एकत्र येणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या.


हृतिक आणि सुझान पुन्हा एकदा विवाहबंधनात


मात्र आता जणू काही हृतिक आणि सुझान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार यावर शिक्कामोर्तब होतंय. कारण घटस्फोटानंतर जवळपास चार वर्षांनी पहिल्यांदाच हृतिक आणि सुझान मुलांशिवाय भेटणार आहेत..आणि ही भेट चक्क गोव्यात होणार असल्याचंही समजत आहे.


एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याची उपरती


दोघांनाही एकमेकांना वेळ द्यायचाय. त्यामुळे सुपर थर्टी सिनेमाचं शूटींग आपटत 22 मार्चला हृतिक आणि सुझान गोव्याला जाणार आहेत, जणू दोघांनाही आपण एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याची उपरती झालीय, म्हणूनच चार वर्षानंतर का होईना पुन्हा एकदा आपला संसार आपण पूर्वीसारखाच गुण्यागोविंदाने करू असंच जणू या दोघांनाही वाटत असावं.