मुंबई : टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन हे दोन्ही कलाकार त्यांच्या अभिनयाप्रमाणेच खास नृत्यशैलीमुळे त्यांच्या रसिकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच हृतिक आणि टायगर 'यशराज  बॅनर्सच्या' एका चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. याची अधिकृत घोषणा ट्विटरवरून करण्यात आली आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. एप्रिल २०१८मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.


हृतिक आणि टायगर एकत्र येणार असले तरीही सध्या त्यांच्यामध्ये ट्विटरवर युद्ध सुरू आहे. 




 


हृतिकला गुरू मानणार्‍या टायगरने एका ट्विटमध्ये लिहले होते, ' तुम्ही माझ्या गुरूस्थानी आहात पण वेळ कधी बदलेल हे सांगू शकत नाही.  यावर हृतिकनेही पलटवार केला आहे. टायगरला उत्तर देताना तो म्हणाला, ' गुरूकडेही खास तंत्र असतात. जी शिष्याला तो शिकवत नाही. या दोन्ही ट्विटमध्ये #HrithikVsTiger वापरला आहे.  


टायगर आणि हृतिक नवा अ‍ॅक्शनपट घेऊन येणार याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे यादोघांमधील नेमकं युद्ध काय आहे ? हे पाहण्यासाठी २५  जानेवारी २०१९ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.