मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखपुड्याला पोहोचला Hrithik Roshan
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखपुड्यात Hrithik Roshan पोहोचला गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत, पाहा Video
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सबा आझादसोबत (Saba Azad) असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. हृतिक आण सबाने त्यांच्या नात्याची सार्वजनिक रित्या कबुली दिली नसली तरी अनेक कार्यक्रमांना दोघे एकत्र हजेरी लावतात. नुकताच दोघांनी मराठमोळ्या अभिनेत्रीत्या साखपुड्याला हजेरी लावली, त्यामुळे सबा आणि हृतिकच्या चर्चांना उधाण आलं आहे. ( hrithik roshan attends engagement ceremony Saba Azad)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree mote) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. नुकताच भाग्यश्रीचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. भाग्यश्रीच्या साखरपुड्याच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादसह हजेरी लावली. (Bhagyashree mote engagement ceremony)
महत्त्वाचं म्हणजे यावेळी हृतिक आणि सबाने सारख्या रंगाचे कपडे घातल्यामुळे प्रत्येकाच्या नजरा दोघांवर येवून थांबल्या होत्या. त्यांचा रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडीओ ‘वूम्पला’च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
भाग्यश्री मोटे विजय पालांडेसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. भाग्यश्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना साखरपुड्याची माहिती दिली. (vijay palande with Bhagyashree mote)
कोण आहे विजय पालांडे (vijay palande)
विजय पालांडे एक मेकअप आर्टिस्ट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विक्रम वेधा चित्रपटासाठीही त्याने हृतिकचा मेकअप केला होता. एवढच नाही तर, त्याने आतापर्यंत फोटोशूट आणि जाहिरातींच्या शूटिंगसाठी हृतिकची हेयर स्टाईल केली आहे.