मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिकचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच हृतिकचा 'विक्रम वेध' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता यूट्यूबर कमाल आर खान उर्फ ​​केआरकेनं हृतिक रोशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक डोक्यावरचे केस दिसत नाही आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : शरीर डिटॉक्स करण्यासाठी एका तासात किती पाणी प्याल?


हृतिक रोशनचा टक्कल असलेला हा व्हिडिओ केआरकेनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हृतिकला ट्रोल करत केआरके म्हणाला, जेव्हा हृतिक त्याचा हेअर पॅच लावायला विसरतो... केआरकेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सगळ्याक आधी तो कॅमेरा हृतिकचा चेहरा कव्हर करताना दिसतो. तर नंतर कॅमेरा हृतिकच्या पाठीमागे सरकतो तेव्हा हृतिकच्या डोक्यावर एक पॅच दिसतो जिथे केस नाहीत. 



केआरकेनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, 'तू तर पूर्ण वीग वापरतोस. या व्हिडीओवरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'वडिलांच्या डोक्यावर केस नाहीत तर याला कसे येणार.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अरे हा तर टकला आहे.' (hrithik roshan bald video shared by krk fans trolled him back) 


यासोबतच केआरकेने हृतिक रोशनच्या 'फायटर' या चित्रपटाबाबतही ट्वीट केलं आहे. केआरकेने ट्विट करून लिहिले की, 'प्रिय हृतिक रोशन तुझ्या 'विक्रम वेधा' या चित्रपटाविषयी खूप आधी भविष्यवाणी केली होती, आणि तुझा पुढचा चित्रपट 'फायटर' देखील फ्लॉप ठरेल असा माझा अंदाज आहे. मग आता काय म्हणता? मी बॉलीवूडच्या इतिहासातील नंबर 1 समीक्षक आहे की नाही? कृपया उत्तर द्या!'.