Hrithik Roshan Shared Photo On New Year : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक रोशन हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच हृतिकनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यानं शेअर केलेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिक रोशननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हृतिकनं काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि जॅकेट परिधान केले आहे. तर त्यानं त्याचे अॅब्स दाखवले आहेत. हृतिकची बॉडी ही तरुणांना लाजवणारी आहे. त्याची पोस्ट पाहता 2023 ची त्याची ट्रान्सफॉर्मशनं सगळ्यांना धक्काबसला आहे. हा फोटो शेअर करत 'ठीक, आहे चला जाऊया'. त्याचा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत त्याच्या ट्रान्सफॉर्मशनची स्तुती केली आहे. हृतिकचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 48 व्या वर्षी हृतिक हा इतका फिट असल्यानं सगळ्यां आश्चर्य झाले आहे. हृतिक 10 जानेवारी रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करणार आहे. (Hrithik Roshan Viral Photo) 



हृतिकचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून 14 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन त्याची मुलं हृहान, हृधान आणि गर्लफ्रेंड सबा आझाद आणि चुलत भाऊ एशान आणि पश्मिनासोबत फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसला. यावेळी हृतिक स्की रिसॉर्टला गेल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यानं तिथे खूप एन्जॉय केल्याचे फोटोमधून दिसत आहे. हा फोटो शेअर करत सगळ्यांना 'मेरी ख्रिसमस' असे कॅप्शन दिले आहे.  (Hrithik Roshan Fitness Freak) 


हेही वाचा : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने Ketki Chitale ट्रोल, उत्तर देत म्हणाली...


दरम्यान, वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर , हृतिक रोशन दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone)त्याचा आगामी चित्रपट, 'फायटर' (Fighter) साठी तयारी करताना दिसत आहे. गेल्या वर्षी, हृतिक आणि दीपिकाने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. यावेळी फायटरची निर्मिती करणारे Marflix प्रॉडक्शनने हृतिक आणि सिद्धार्थ आनंदचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत "आणि ते सुरू होतयं....#FIGHTER." सगळ्यात शेवटी हृतिक हा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) दिसला होता.