Ketki Chitale On Bhima-Koregaon battle anniversary : मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे ओळखली जाते. केतकी तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा केतकी तिनं शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. केतकीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी केतकीनं कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाबद्दल काहीही भाष्य न केल्यानं अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आता तिनं उत्तर दिले आहे.
दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा केला जातो. यानिमित्तानं ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी कोरेगाव भीमा येथे राज्याच्या विविध भागातून लोक येतात. दरम्यान, अशा परिस्थितीत केतकी चितळेनं नववर्षाच्या निमित्तानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी तिनं याविषयी कोणतेही वक्तव्य केलं नाही किंवा त्या निमित्तानं पोस्टही शेअर केली नाही. यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे.
केतकीनं तिच्या फेसबूक अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत केतकी मद्यपान करताना दिसली. हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं 'फादर, त्या सगळ्यांना माफ करा. कारण त्यांना माहित नाही ते काय करतायत. मी काही चुकीचं बोलत असेल तर नक्कीच मला सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है। सगळ्यांना माफ करा पण कधी विसरू नका, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा, असे कॅप्शन दिले आहे. यामुळे केतकी सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
दरम्यान, या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला कोरेगाव भीमा दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “तमाम भारतीयांना भिमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे.” या नेटकऱ्याला केतकीनं सडेतोड उत्तर दिले आहे. केतकी म्हणाली, “भिमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?! ब्रिटिश सरकारच्या बाजूनं मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी धर्मद्रोही वाटते, किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमके काय?” असा प्रश्न तिने यावर उत्तर दिले आहे.
हेही वाचा : 'शंकराच्या मंदिरात आणि काली मातेला दारूचा नैवद्य चालतो...', Ketaki Chitale ची वादग्रस्त कमेंट
दरम्यान, केतकीला या आधी तिनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते. केतकीच्या या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, "वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका… आणि आपण ढोसायचं.." अशी कमेंट केली होती. त्यावर नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत केतकी म्हणाली, 'मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? 2. सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही. 3. स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते आणि सांगते. फरक शिका”, असे केतकी म्हणाली. केतकीनं दिलेल उत्तर पाहता तो नेटकरी म्हणाला, "अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद."