मुंबई : बॉलीवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनने सबा आझादसोबतच्या नात्याचा खुलासा केल्यापासून तो सतत चर्चेत आहे. हे कपल दररोज त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ज्यामध्ये ते एकमेकांच्या प्रेमात हरवल्याचं स्पष्टपणे दिसून येतात. दरम्यान, सबाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची खूप चर्चा होत आहे. ही पोस्ट पाहून लोकं तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत आहेत. अनेकांनी ती प्रेग्नंट असल्याचंही म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हृतिक आणि सबाच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या होत्या. दोघंही अनेकदा रोमँटिक डेटवर जाताना एकत्र दिसले होते. हे जोडपं सगळ्यांसमोर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आता सबाची एक पोस्ट पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिला प्रेग्नेंसीशी संबंधित प्रश्न विचारत आहेत. अभिनेत्रीची ही व्हायरल पोस्ट तुम्हीही पाहा.


सबाच्या या पोस्टमध्ये तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यापोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'तुमचा स्त्रीरोगतज्ज्ञ कोण आहे?' हा फोटो शेअर करत सबाने लिहिलं आहे की, 'सध्या फक्त हाच प्रश्न माझ्या मनात घुमत आहे.' ही पोस्ट पाहून सबाचे चाहते आश्चर्यचकित झाले असून त्यांनी अभिनेत्रीला विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. लोक पोस्टवर भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'आधी लग्न कर आणि मग स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जा.' तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, 'काही गुडन्यूज आहे का?'



तर चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, हृतिक लवकरच एरियल अॅक्शन थ्रिलर फायटरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. पुढील वर्षी 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो कियारा अडवाणी आणि जूनियर एनटीआरसोबत वॉर २ मध्ये दिसणार आहे. दरम्यान, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद शेवटची रॉकेट बॉईजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती.


 बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हे दोघे बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट होतात. सबा आणि हृतिक हे अनेकदा पार्ट्यांमध्ये किंवा डिनर डेट किंवा मग लंचवर गेल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते दोघे जिथे असतात तिथे सगळ्याचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतात. हृतिक आणि सबा यांच्या लग्नाची चर्चा त्यांच्या रिलेशनशिपविषयी कळल्यापासून सुरु आहे.