Hrithik Roshan got Trolled over Viral Video : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. तर हृतिकचे लाखो चाहते आहेत. तो कुठे जातो, काय करतो, त्याचा आगामी चित्रपट कोणता या सगळ्या गोष्टी त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. इतकंच काय तर त्याच्या कुटुंबाविषयी देखील त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे असचे. दरम्यान, हृतिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हृतिकनं जे केलं ते पाहून नेटकरी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिकचा हा व्हिडीओ मानव मंगलानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला आहे. या व्हिडीओत हृतिक एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडला त्यावेळी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याचे चाहते येतात. अशावेळी एक चाहता फोटो काढायला पुढे आला असता हृतिकचा बॉडीगार्ड त्याला धक्कादेत बाजूला करतो. हृतिकचा हा चाहता एक डिलिव्हरी बॉय होता. हे पाहूनही हृतिककाही बोलला नाही यामुळे नेटकऱ्यांनी हृतिकला ट्रोल केले आहे.   (Hrithik Roshan Viral Video)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एक नेटकरी कमेंट करत बोलतो की, 'आपल्या सगळ्यांमुळे हे आहेत. तर त्या बिचाऱ्याला धक्का दिला. हे स्वत: ला समजतात काय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हे यांच्या चित्रपटाच्या प्रमोशन आधी असं वागतील का? कमीत-कमी आपल्या आजुबाजूच्या लोकांसमोर तरी खोटं हसा.'  तिसरा नेटकरी म्हणाला, 'एक चाहता फोटो काढत असताना बॉडीगार्डनं धक्का दिला तरी हृतिक रोशन काही बोलला नाही ही खूप वाईट गोष्ट आहे. याच्यासोबत फोटो काढणं वाईट आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'कंगना याच्याविषयी एकदम योग्य बोलते.' अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी हृतिकवर नाराजी व्यक्त केली आहे. तर हृतिकचा हा व्हिीडओ पाहिल्यानंतर अनेकांना अपेक्षा होती की हृतिकच्या बॉडीगार्डनं केलेलं हे कृत्य पाहिल्यानंतर त्यानं काही तरी बोलायला हवं होतं. कारण चाहत्यांशिवाय तो नाही. चाहते असतील तरच त्याचे चित्रपट चालतील. 


 हेही वाचा : 'गुदमरून मारण्यासाठी केलेले contract...', अभिनेता Santosh Juvekar ची पोस्ट चर्चेत


दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओत हृतिक रेस्टॉरंटमधून बाहेर येताना जरी दिसला तरी तो त्याच्या कुटुंबाची प्रतिक्षा करत होता. यावेळी त्याच्या मागून त्याची दोन्ही मुलं आणि एक्स वाईफ सुझान खान आणि तिचा बॉयफ्रेंड देखील दिसली.  ते बाहेर येताच गप्पा मारताना दिसले. तर सुझानचा भाऊ देखील यावेळी दिसला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.