Saba Azad Troll for ramp walk : बॉलिवूड अभिनेत्री सबा आजाद सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिचा जीमच्या बाहेरचा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी हृतिकसोबत ती स्पॉट होते. त्यावर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करताना दिसतात. दरम्यान, आता तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सबा ही फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक सुरु असताना डान्स करताना दिसत आहे. सबाचा हा अंदाज काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे तर काही प्रेक्षकांनी त्याचा विरोध केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबानं दिल्लीत झालेल्या फॅशन शो दरम्यान, रॅम्प वॉक केला. या कार्यक्रमात करिश्मा कपूर, कल्कि केकला सारखे अनेक सेलिब्रिटी दिसले. मात्र. चर्चा ही फक्त सबा आजादची होते. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वेगळीच चर्चा सुरु झाली होती. ज्या प्रकारे सबाचे डान्स स्टेप्स होते आणि त्यासोबत तिचे जे एक्सप्रेशन्स होते. हे अनेकांच्या पसंतीस उतरलं नाही आणि त्यांनी सबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सबाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'अशा तरुणांसाठीच मोदी जी यांनी मेंटल हॉस्पिटल सुरु करण्याची घोषणा केली आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'मायकल जॅक्सनची आत्मा हिच्यात आली असं वाटतंय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'व्हिडीओ पाहताना मला वाटलं की ती मेन्टली स्थिर नाही किंवा तिला स्टेजवर मदतीची गरज आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अखाद्याचा चेहरा चांगला नसेल तर कमीत कमी वागणं तर चांगलं हवं.' दुसरा म्हणाला, 'हृतिकला कोणी नाही भेटलं का? तर हिला त्याच्या आयुष्यात एन्ट्री दिली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आजकाल लोकांना रॅम्प वॉक मस्करी वाटते. हे मस्करी नाही, घरात करा. प्रोफेश्नल स्टेजवर आहात याचं भान ठेवा कारण इथे येण्यासाठी लोक खूप स्ट्रगल करतात.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'नशा केली वाटतं.'


हेही वाचा : ...अन् गौरव मोरेला लंडनला विमातळावरच अडवलं; 'या' वक्तव्यामुळे फसला होता 'फिल्टर पाड्याचा बच्चन'


सबानं असं केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण 


सबाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं दिल कबड्डी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सबा एक अभिनेत्री असण्यासोबतच म्यूजिशियन, सिंगर देखील आहे. त्यासोबत ती एक प्रोफेशन्ल डान्सर आहे. रिपोर्ट्सनुसार, सबा आणि हृतिक रोशन हे गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण त्यांनी या आधी एकमेकांचे फक्त चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. लक्षवेधी गोष्ट म्हणजे हृतिक सध्या त्याच्या फायटर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर सबा नुकतीच 'हूज योर गायनेक' या सीरिजमध्ये दिसली होती.