Gaurav More : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका महाराष्ट्राची हास्यजत्रा ही चांगलीच चर्चेत असते. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. फक्त कार्यक्रमाचे नाही तर या कार्यक्रमातील कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. आता याच कार्यक्रमातील अभिनेता गौरव मोरे हा चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्याचं कारण ठरली आहे त्याची लंडन ट्रिप. लंडनला गौरव बाईज 4 या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. त्यावेळी विमानतळावर त्याला अडवण्यात आलं होतं. खरंतर विमानतळावर कोणाला अडवलं की सगळ्यांना भीती वाटते. पण यावेळी गौरवला अडवल्याचं एक भन्नाट कारण समोर आलं आहे.
'बॉईज 4' या चित्रपटाच्या निमित्तानं ही टीम वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाचं प्रमोशन करण्याचे पाहायला मिळाले. यावेळी कलाकारांनी स्टेजवरील वेगवेगळ्या गोष्टी आणि गंमती सांगितल्या. बॉईज 4 चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं चित्रपटाची संपूर्ण कास्ट ही लंडनला गेली होती. त्यावेळी विमानतळावर गौरव मोरेला अडवलं होतं आणि त्याचं भन्नाट कारण देखील त्यांनी सांगितलं. पार्थ भालेरावनं नुकतीच ‘मीडिया टॉक मराठी’ ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत पार्थनं हा किस्सा सांगितला आहे. 'गौरव चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून युकेला येत होता. तो युकेला पोहोचला, पण इमिग्रेशनच्या वेळी त्याला तिथल्या अधिकाऱ्यांनी इथं का आला आहात? येण्याचा उद्देश काय? असे काही साधे प्रश्न विचारले. पण गौरवनं मात्र, असं काही उत्तर दिलं की, अधिकाऱ्यांनी त्याला अडवलं होतं. इथं कशाला आलात? असं विचारल्यावर गौरवनं 'शूटिंगला आलोय' असं उत्तर दिलं होतं. शूटिंग असं उत्तर ऐकल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला अडवलं होतं. तर त्याचा प्रकार पाहिल्यानंतर संपूर्ण टीमला आधीच सुचना देण्यात आली की असे काही प्रश्न विचारल्यास शूटिंगसाठी किंवा फिल्मोग्राफीसाठी आलोय असं सांगण्यास सांगितले', असं पार्थ म्हणाला.
हेही वाचा : 'आत्महत्येपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार', आकांक्षा दुबेच्या आईचा दावा
चित्रपटाच्या कास्टिंगविषयी बोलायचे झाले तर यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.