मुंबई : देशातील विख्यात गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून आनंद कुमार यांची चर्चा सुरु आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांपूर्वी आनंद कुमार यांची एक मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीनंतर अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडिओमध्ये आनंद कुमार यांनी आपल्याला गंभीर आजार असल्याचा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आनंद कुमार हे आपल्याला ब्रेन ट्युमर असल्याचं सांगत आहेत. 



२०१४ मध्ये कानाच्या उपचारासाठी ते रुग्णालयात गेले असता त्यांना या आजाराबाबतची माहिती मिळाली. त्यावेळी आपल्यासोबत एक विद्यार्थी असल्याचंही आनंद कुमार यांनी सांगितलं. आनंद यांच्यावर या आजारासंदर्भातील कोणतीही शस्त्रक्रिया अद्यापही करण्यात आलेली नाही. 


काही वर्षांपूर्वी त्यांना ऐकण्यास समस्या आल्यामुळे ते तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. तेव्हाच ऐकण्याची ८०-९० टक्के क्षमता संपली असल्याचं त्यांना समजलं. डोक्याच्या ज्या भागात ट्यूमर आहे तो भाग अतिशय नाजूक आहे. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया झाल्यास त्यांना अर्धांगवायूचा झटकाही येऊ शकतो असं सांगण्यात आलं. म्हणूनच अद्याप त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.



'सुपर ३०' येत्या १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आनंद कुमार यांची प्रमुख भूमिका साकारत आहे.