मुंबई: सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना बॉलीवूड इंडस्ट्रीतील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृतिक रोशन आणि सुझान खान या दोघांनी लॉकडाऊनच्या २१ दिवसांच्या काळात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले असले तरी आपल्या रेहान आणि रिदान या मुलांसाठी ते अनेकदा एकत्र येताना दिसतात. आतादेखील लॉकडाऊनच्या काळात दोन्ही मुलांना आईची उणीव भासू नये म्हणून हृतिकने सुझानला २१ दिवस आपल्या घरी येऊन राहण्याची विनंती केली होती. सुझानने कोणतेही आढेवेढे न घेता हृतिकचा हा प्रस्ताव मान्य केला. याबद्दल हृतिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सुझानचे आभार मानले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पाहा, मोदीही पाळतायंत सोशल डिस्टन्सिंग


या पोस्टसोबत हृतिकने एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये सुझान खान हृतिकच्या घरात बसलेली दिसत आहे. आमच्या मुलांसाठी सुझान तात्पुरती माझ्या घरी राहायला आली आहे. या समजुतदारपणासाठी मी सुझानचा आभारी आहे, असे हृतिकने पोस्टमध्ये म्हटले आहे. सुझाननेही हृतिकच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. मानवी इतिहासात हे इतरांसाठी डोळे उघडणारे ठरेल, असे सुझानने म्हटले आहे. 



क्वारंटाईन ब्रेकमध्ये अर्जुन कपूरला मिळाली खास व्यक्तीची साथ


साहजिकच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिनेता रोहित रॉय याने म्हटले आहे की, हृतिक आणि सुझान तुम्ही किती चांगली प्रेमकहाणी लिहत आहात. तर अभिनेता टायगर श्रॉफने यामधून किती शिकण्यासारखे आहे, अशी कमेंट केली आहे.