क्वारंटाईन ब्रेकमध्ये अर्जुन कपूरला मिळाली खास व्यक्तीची साथ

सेलिब्रिटींनीही सध्या परिस्थितीचं गांभीर्य जाणत घरातच राहणं पसंत केलं आहे   

Updated: Mar 23, 2020, 04:34 PM IST
क्वारंटाईन ब्रेकमध्ये अर्जुन कपूरला मिळाली खास व्यक्तीची साथ
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  Corona कोरोना व्हायरसच्या काळात संपूर्ण देशभरात दक्षता पाळण्यात येत आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता सर्वच ठिकाणी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. याच धर्तीवर मुंबईसह देशभरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा वेग काहीसा मंदावला आहे. अगदी कलाविश्वसुद्धा याला अपवाद ठरलेलं नाही. 

गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपट किंवा कोणत्याही प्रोजेक्टचं काम हे नव्याने सुरु करण्यात आलेलं नाही. किंबहुना काही कामं तातडीने थांबवण्यातही आली. यामध्येच कलाकार मंडळींनी हा वेळ त्यांत्या घरातच व्यतीत करण्याला प्राधान्य दिलं. 
सहसा चित्रीकरणआच्या निमित्ताने सतत घराबाहेर असणाऱ्या या मंडळींना हा क्वारंटाईन ब्रेक एक नवा अनुभव देणारा ठरत आहे. अभिनेता अर्जुन कपूरही अशाच काही कलाकारांपैकी एक. अर्जुनही सध्या क्वारंटाईम ब्रेकवर आहे. यावेळी तो कुटुंबासमवेत एका खास व्यस्तीलाही वेळ देत आहे. 

क्वारंटाईन ब्रेकमध्ये अर्जुनला साथ देणारी ही व्यक्ती म्हणजे त्याची प्रेयसी, अभिनेत्री मलायका अरोरा. रविवारी जनता कर्फ्यूच्या निमित्ताने ज्यावेळी घराबाहेर येऊन जनतेने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांप्रती आभार व्यक्त केले, तेव्हा अर्जुन आणि मलायकानेही यात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं.


छाया सौजन्य- योगेन शाह 


छाया सौजन्य- योगेन शाह 

 

रविवारी सायंकाळच्या सुमारा अर्जुनने मलायकाच्या घरी भेट दिली. यावेळी या दोघांनीही उत्स्फूर्तपणे बाहेर येत आपल्या अंदाजात आभार व्यक्त केले. सध्याच्या घडीला बी- टाऊनमधील बहुचर्चित जोड्यांपैकी अर्जुन- मलायकाचा हा अंदाज पाहता क्वारंटाईन ब्रेक त्यांच्यासाठी जितका सावधगिरी बाळगत कोरोनापासून दूर राहण्यास मदतीचा ठरणार आहे तितकाच तो त्यांच्या नात्यासाठीही खास आहे, असंच म्हणावं लागेल.