पाचव्या दिवशी हृतिक-टायगरच्या `वॉर` सिनेमाने रचला रेकॉर्ड
एकाचवेळी 18 विक्रम केले नावावर
मुंबई : वॉर (WAR) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. या सिनेमाने पाचव्या दिवशी आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' सिनेमावर शनिवारी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 30 टक्के वाढ झाली. या सिनेमाला मिळणारं प्रेम आणि मागणी पाहता हा सिनेमा लवकरच 200 करोड रुपयांचा आकडा पार करेल यात शंकाच नाही.
रिपोर्टनुसार, 'वॉर' सिनेमा 2019 मध्ये रविवारी सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 'वॉर' सिनेमाने रविवारी 35.5 ते 36 करोड रुपयांच कलेक्शन केलं आहे. शनिवारपेक्षा सिनेमाने रविवारी 30 टक्यांहून अधिक कमाई केली होती. याप्रकारे सिनेमाने पाच दिवसांत 158 करोड रुपयांची कमाई केली आहे.
'वॉर' सिनेमाला वीकेंड बरोबरच सणांचा देखील फायदा झाला आहे. नवमी आणि दशमीची सुट्टी आल्यामुळे कलेक्शन चांगल झालं आहे. 'वॉर' सिनेमाने पहिल्या दिवशी 51.60 करोड रुपये, दुसरे दिन 23.10 करोड रुपये, तिसऱ्या दिवशी 21.30 करोड रुपये आणि चौथ्या दिवशी 27.60 करोड रुपयांची कमाई केली आहे.
'वॉर' या सिनेमाने आतापर्यंत 17 रेकॉर्ड रचले आहेत. रविवारच्या कलेक्शननंतर या सिनेमाने 18 रेकॉर्ड रचून विक्रम केला आहे. यामध्ये हिंदी सिनेमात सर्वाधिक ओपनिंग फिल्म, हृतिक रोशनच्या करिअरमधील सर्वात ओपनिंग फिल्म, टायगरच्या करिअरमधील सर्वात ओपनिंग फिल्म, यशराज बॅनरची सर्वात मोठी फिल्म यासारखे अनेक रेकॉर्ड या सिनेमाचे रचले आहेत. गांधी जयंतीला रिलीज झालेल्या सिनेमांत 'वॉर'ने रेकॉर्ड रचला आहे.