मुंबई : कंगना राणौत (Kangana Ranaut)  आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) एकमेकांसमोर पुन्हा ढाकले आहेत. कंगना रानौतसोबत झालेल्या वादावर हृतिक रोशनला समन्स पाठवण्यात आला आहे. कंगना विरोधात ऋतिकने तक्रार नोंदवली आहे. जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता ऋतिक रोशनला समन्स बजावण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययुतर्फे हा समन्स बजावण्यात आला आहे. ऋतिक रोशन याने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली त्याच्या चौकशीसाठी हा समन्स पाठवण्यात आला आहे. जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी ऋतिक रोशनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई क्राईम ब्रांच तपास करत आहे. 



हृतिक रोशनला क्राइम ब्रांचच्या क्रिमिनिल इंटेलिजेंस यूनिटमध्ये येऊन जबाब नोंदवला आहे. हे प्रकरण 2016 मध्ये जेव्हा हृतिकने कंगनाच्या अकाऊंटवरून 100 हून अधिक ईमेल मिळाल्याची तक्रार नोंदवली होती. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचे प्रकरण सायबर सेलकडून क्राइम ब्रांच इंटेलिजेंसकडे सोपवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, हृतिक रोशनचे वकिल महेश जेठमलानी हे प्रकरण ट्रान्सफर करण्यासाठी मुंबई पोलीस कमिश्नर यांनी पत्र लिहिलं होतं. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या पत्रात महेश जेठमलानी यांनी म्हटलं की, '2013-14 कंगना रानौतच्या ई-मेल आयडीवरून हृतिक रोशन यांना आलेल्या मेल प्रकरणात सायबर सेलकडून काहीच कारवाई झाली नाही.यामुळे आता हे प्रकर मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलं आहे.'