Sussanne Khan Bikini Photos With Boyfriend: सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशनच्या एक्स वाईफची. सुझॅन खान ही सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 2014 साली सुझॅन खान आणि हृतिक रोशन हे वेगळे झाले. घटस्फोट घेतल्यानंतर सुझॅननं हृतिककडे कोट्यवधी रूपयांची पोटगी मागितली होती. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती. आता दोघंही विभक्त झाले आहेत आणि त्यांनीही आपल्या आयुष्यातला साथीदार निवडला आहे. सुझॅनही सध्या कमिटेड आहे आणि त्याचप्रमाणे हृतिक रोशनही अभिनेत्री सबा आझादला डेट करतो आहे. त्यामुळे त्या दोघांचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सबा आझादला अनेकदा ट्रोलही करण्यात येते. हृतिक रोशनपेक्षा सबा आझाद फारच लहान दिसते यावरून तिला नेटकऱ्यांची टीका सहन करावी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुझॅन खान आणि हृतिक रोशन हे अनेकदा त्यांच्या मुलांच्या निमित्तानं एकत्र भेटत असतात. त्यातून दोघंही त्यांच्या खाजगी आयुष्यासाठी लोकप्रिय आहेत. अभिनेत्री सुझॅन खान ही मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करताना दिसते आहे. सध्या त्यांचे लेटेस्ट फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या ते दोघं व्हेकेशन मोडमध्ये आहेत आणि फारच एन्जॉय करताना दिसत आहेत.


हेही वाचा - प्रेग्नंट असतानाच घटस्फोट; आता गोविंदाच्या भाचीनं थाटला दुसरा संसार


सुझॅननं एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, माझ्या आवडत्या व्यक्तीसोबतचा आनंद आणि आठवणी... तिचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच चर्चेत आहेत. सुझॅन आणि अर्सनाल हे गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हृतिकही त्यांच्या पोस्टवर अनेकदा कमेंट करताना दिसतो. त्यातून सुझॅनही हृतिक रोशन आणि सबा आझादच्या फोटोंवर कमेंट करताना दिसते. त्यामुळे विभक्त झाल्यावर हे दोघं ज्यांना ज्यांना डेट करत आहेत. त्यांच्या डेटिंगला एकमेकांनी स्विकारलं आहे असंच दिसतं आहे. त्यामुळेही विशेषत: त्यांची चर्चा होताना दिसते.  


मॉडेलिंगसोबत अर्सनाल हा अभिनेताही आहे. त्यानंही ‘मैं हीरो बोल रहा हूं' या वेबसिरिजमधून भुमिका केली आहे. खरं म्हणजे सबा आझाद, सुझॅन खान आणि हृतिक रोशन हे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांच्या एकत्र फोटोंचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. मध्यंतरीही ते असेच एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगली होती. आता सुझॅन ही आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोंमुळे विशेष चर्चेत आली आहे. तुम्ही तिचे फोटो पाहिलेत का? 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावेळी सुझॅन खान ही ट्रोलही झाली आहे. तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. एका युझरनं त्यांची ही मज्जा पाहून लिहिलंय की, ''व्वा, काय तुझा एक्स हसबंड तुझा सगळा खर्च पुरवतो का?'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''म्हणून यांचे म्हातारपण हे खराब आहे कारण यांना या वयात स्वत: व्यतिरिक्त दुसरं काहीही महत्त्वाचं नाही.'' तर एका युझरनं लिहिलंय की, ''400 कोटी रूपयांची अय्याशी'' अनेक जण तिला हृतिकनं दिलेल्या 400 कोटी रूपयांच्या पोटगीवरूनही ट्रोल करत आहे. आता सुझॅन ही त्याच पैशांवर मजा मारते आहे असं त्यांनी म्हटलं आहे.