Hritik Roshan: हॉलीवूडच्या तोडीसतोड सिनेमे करणारा हृतिक रोशन (Hritik Roshan) हा आपल्या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विक्रम वेधा (Vikram Vedha) हा हृतिकचा कमबॅक मूव्ही प्रसिद्धी झाला आहे. त्यामुळे सध्या याच चित्रपटाची चर्चा आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा आपली जादू दाखवू शकला नसून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Vikram Vedha Box Office Collection) दाक्षिणात्त्य चित्रपटांच्या तुलनेत फारच कमी कमाई केली आहे. सध्या हृतिक चर्चेत आहे तो आपल्या गर्लफ्रेंड सबा आझादमुळे. सबासोबत हृतिक अनेकदा ट्रोलही झाला आहे परंतु आता हृतिक वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आला आहे. (hritik roshan hollywood vikram vedha viral news) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल बॉलीवूड तसेच प्रादेशिक चित्रपटांचे कलाकार हॉलीवूडमध्येही आपलं करिअर घडवताना दिसत आहेत. याचं ताजं उदाहरणं म्हणजे प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra Hollywood Movies). काही महिन्यांपुर्वी दाक्षिणात्त्य स्टार अभिनेता धनुषचा (Dhanush and Aishwarya) हॉलिवूड चित्रपट 'द ग्रे मॅन' (The Grey Man) प्रदर्शित झाला होता. यानंतर आता आलिया भट्ट (Alia Bhatt), शोभिता धुलिपाला आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) या अभिनेत्रीही लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहेत. यापुर्वी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि प्रियांका चोप्रा यांनी हॉलिवूड चित्रपटांतून कामं केली आहेत. आता या यादीमध्ये अजून एका नव्या लोकप्रिय कलाकाराची हजेरी लागणार आहे.  विक्रम वेधा हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर हृतिक रोशनही हॉलिवूडमध्ये काम मिळवण्याच्या प्रयत्नात दिसतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हृतिक रोशनही हॉलीवूडमध्ये (Hritik Roshan in Hollywood) पदार्पण करायच्या तयारी आहे. 


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'


आता बॉलीवूड चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत आहेत त्यातून मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी आपली जादू दाखवू शकलेले नाहीत. सध्या बॉलीवूडमध्ये ((Flop Films in Bollywood) सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमुळे कलाकारांना असुरक्षित वाटत असल्याचे जाणवते आहे. तेव्हा आता बॉलीवूड कलाकार आपले नवे मार्ग शोधताना दिसतं आहे. 


हृतिकने हॉलिवूडमधील द गर्श एजन्सीशी (The Gersh Agency) संपर्क साधल्याचे वृत्त आहे. गर्श एजन्सी ही अमेरिकेतील चौथी सर्वात मोठी क्रिएटिव्ह एजन्सी आहे. ज्याचं कार्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की या एजन्सीने काही चित्रपटांसाठी हृतिककडे बोलणी केल्या आहेत, असे समजते. 


हृतिकनं यापुर्वीही हॉलीवूड चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती परंतु हृतिकनं स्वतःहूनच या चित्रपटाला नकार दिला आहे. 2015 मध्ये हृतिकला हॉलिवूड कॉमेडी चित्रपट द पिंक पँथर 2 (The Pink Panther 2) ची ऑफर आली होती, जी त्याने नाकारली होती.  या चित्रपटात हॉलिवूड कलाकारांसोबत ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) देखील होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगला हीट ठरला होता.  


आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे


यातला कोणता चित्रपट आता हृतिक स्विकारणार हे आता पाहायचे आहे. विक्रम वेधा (Vikram Vedha) हा कमबॅक चित्रपटही फ्लॉप ठरल्यानं आपल्या करिअरसाठी आता हृतिकला चांगलीच कंबर कसावी लागणार आहे. त्यातून गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये त्याला त्याची जादू दाखवता आली नसून वेगळ्या चित्रपटांची निवडही हृतिकला करावी लागणार असल्याचं दिसत आहे. हृतिकने सुरुवातीपासूनच चित्रपटांची निवड करताना खूप खबरदारी घेतली आहे. आपल्या वडिलांनीच बनवलेल्या चित्रपटांमध्ये त्याला चांगलेच यशही मिळालं आहे.