मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांना किती पगार मिळणार पाहिलं का? Per Month Salary थक्क करणारी

Ddevendra Fadnavis Per Month Salary As CM Of Maharashtra: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावर विराजमन होणारे फडणवीस या पदावर प्रत्येक महिन्याला किती रक्कम वेतन म्हणून घेणार तुम्हाला ठाऊक आहे का?

| Dec 04, 2024, 14:39 PM IST
1/12

devendracmpostsalary

देवेंद्र फडणवीसांना किती वेतन मिळणार तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या पदावर असल्याबद्दल किती वेतन मिळतं.

2/12

devendracmpostsalary

भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.   

3/12

devendracmpostsalary

गटनेते पदी निवड झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतील हे निश्चित झालं आहे. 

4/12

devendracmpostsalary

फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी 2014 ते 2019 असा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. नंतर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर ते दिड दिवसांचे मुख्यमंत्री झालेले.

5/12

devendracmpostsalary

फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याने भाजपा समर्थकांना पुन्हा एकदा 'केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' असं चित्र पाहायला मिळणार आहे.  

6/12

devendracmpostsalary

5 डिसेंबर रोजी मुंबईतील फोर्ट भागामधील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासंदर्भातील निमंत्रणपत्रिकाही महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांनी जारी केल्या आहेत.  

7/12

devendracmpostsalary

मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळणार तुम्हाला माहित आहे का?  

8/12

devendracmpostsalary

तर देशातील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या निकषांवर आधारित वेतन श्रेणी निश्चित केली जाते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या पगारापेक्षा अधिक आहे. 

9/12

devendracmpostsalary

दरडोई उत्पन्नानुसार महाराष्ट्र हे राज्यातील सर्वात श्रीमंत राज्य असल्याने तसेच अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे उद्योग आणि इतर आर्थिक बाबतीतही महाराष्ट्र अनेक राज्यांपेक्षा पुढे असल्याने सहाजिक मुख्यमंतत्र्यांच्या पगाराच्या बाबतीतही असेच चित्र दिसते.

10/12

devendracmpostsalary

सर्वाधिक मासिक पगार घेणाऱ्या देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा समावेश होतो. आता पुढील पाच वर्ष फडणवीस या पदावर असणार आहेत.  

11/12

devendracmpostsalary

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दर महिना 3 लाख 40 हजार रुपये वेतन मिळतं. याचप्रमाणे वेगवेगळे भत्ते आणि खर्चासाठीही रक्कम मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या व्यक्तीला दिली जाते. पगारमधूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षाचे 40 लाख 80 हजार रुपये मिळतात.  

12/12

devendracmpostsalary

या शिवाय मुख्यमंत्री म्हणून सरकारी निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला, कार आणि नोकरचाकरांच्या माध्यमातून मदतनीसही सरकारच्या माध्यमातूनच पुरवले जातात.