मुंबई :  'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे कायम तिच्या खास अंदाजामुळे चर्चेत असते. आता देखील अनेकांच्या लाडकी हृता दुर्गुळेने असं काही केलं ज्यामुळे ती पुन्हा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच हृता दुर्गुळेने झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी मंचावर मंगळगौरीचा कार्यक्रम रंगला. यावेळी हृताने भन्नाट उखाणाही घेतला.  हृताने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ती या मंचावर मंगळगौर खेळली आणि भन्नाट उखाणाही घेतला. हृताने मंचावर पतीसाठी घेतलेला उखाणा सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये उखाणा घ्यायला सांगितल्यावर हृता एका अटीवर उखाणा घ्यायला तयार होते. 


हृता म्हणते, 'मी एक उखाणा घेईल पण त्यावर कोणी हासणार नाही..' जमलेल्या सर्व महिलांना अट घातल्यानंतर हृताने उखाणा घेतला. “एक बॉटल, दोन ग्लास… प्रतीक माझा फर्स्टक्लास…” हृताने हा भन्नाट उखाणा घेत सर्वांची मनं जिंकली


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनं प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत असणाऱ्या नात्याला नवी ओळख दिली आहे. लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही मनांची राणी हृता आता मिसेस हृता प्रतीक शाह म्हणून ओळखली जात आहे.