Double XL रिलीज होण्यापूर्वी हुमा कुरेशीचं झालं हार्टब्रेक; संपलं 3 वर्षांचं नातं
हुमा कुरेशी ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.
मुंबई : हुमा कुरेशी ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. याचं एक कारण म्हणजे तिचा 'डबल एक्सएल' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर हुमाच्या चर्चेत येण्याचं दुसरं कारण म्हणजे तिचं ब्रेकअप. खरंतर, दिग्दर्शक मुदस्सर अजीजला तीन वर्ष डेट केल्यानंतर अभिनेत्रीचं ब्रेकअप झालं आहे.
ब्रेकअपनंतरही एकत्र चित्रपटांची निर्मिती करणार
एका रिपोर्टनुसार, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अझीझ यांचे मार्ग आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मात्र, रिपोर्ट्सनुसार, ब्रेकअपनंतरही दोघं एकत्र चित्रपटांची निर्मिती करत राहणार आहेत. दोघांमध्ये कोणतंही वैर नाही आणि ते मित्रच राहतील. मात्र, त्यांनी एकमेकांसोबतची लव्ह लाईफ का संपवलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
मुदस्सरने हुमाच्या आधी सुष्मिता सेनला डेट केलं होतं
एका सूत्राने ETimes ला सांगितलं आहे की, "नक्कीच त्यांच्या नात्यातील कटुतेमुळे त्यांनी त्यांची रिलेशनशिप संपवली आहे. पण ते खूप परिपक्व आहेत आणि आयुष्यात अशा गोष्टी घडतात हे त्यांना चांगलं माहीत आहे." हुमा कुरेशीपूर्वी मुदस्सरने सुष्मिता सेनलाही डेट केलं होतं. दोघांचं नातं बरेच दिवस टिकलं पण नंतर दोघंही वेगळे झाले.
हुमाचा आगामी चित्रपट
कामाच्या आघाडीवर, हुमा कुरेशी लवकरच 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हुमासोबत सोनाक्षी सिन्हाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाची स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसं, आम्ही तुम्हाला सांगतो की हुमाच्या या चित्रपटाचा लेखक तिचा एक्स बॉयफ्रेंड मुदस्सर आहे.