Huma Qureshi Talked About Rape Scene In Badlapur Movie : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हुमा कुरेशी सध्या तिच्या 'डबल एक्सएल' (Double XL)या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, हुमानं 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'बदलापूर' (Badlapur) या चित्रपटातील अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली होती. या चित्रपटात अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटाविषयी हुमानं एक धक्कादायक खुलासा केला आहे. चित्रपटातील बलात्काराचा सीन शूट केल्यानंतर तिच्यावर त्याचा कसा परिणाम झाला याविषयी तिनं सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'बदलापूर' या चित्रपटातील अभिनयाविषयी हुमानं प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडली. या चित्रपटात हुमानं सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. अलीकडेच, एका मुलाखतीत हुमानं चित्रपटाशी संबंधित एका सीनविषयी सांगितले. यावेळी हुमानं सांगितले की, बलात्काराचा सीन शूट केल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसला.



एका मुलाखतीत हुमा कुरेशीने सांगितले की या चित्रपटात तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. तिनं हे पात्र केले कारण लोकांना सेक्स वर्करबद्दल आणि त्यांचा आयुष्याबद्दल प्रेक्षकांना कळणं महत्त्वाचे होते. कारण लोक त्यांना अगदी सहजपने जज करतात आणि त्यांच्यावर बलात्कार केला जाऊ शकत नाही अशी लोकांची समज असते. 


'शूटिंग झाल्यानंतर जेव्हा ती तिच्या रूममध्ये परत जायची तेव्हा तिच्या अंगावर सगळे कपडे असायचे, आणि तिला माहित होतं की जे झालं ते सगळं स्किप्टेड होते.  परंतु जेव्हा ती घरी परतायची तेव्हा तिचे हात थरथरायचे,' असे हुमानं मुलाखतीत सांगितले.


हेही वाचा : Suhana Khan नं आई गौरीसोबत असं केलं नवीन वर्षाचे स्वागत, शाहरुखच्या लेकीचा लूक चर्चेचा विषय


हुमा पुढे म्हणाली की, 'सीन शूट झाल्यानंतर तिला खूप राग आला कारण तुम्हाला समोरच्या व्यक्तीला मारायचे आहे, पण तुम्ही ते करू शकत नाही. त्यामुळे तिला खूप राग आला. पण तिला तिचा राग कसा तरी शांत करावा लागला' विशेष म्हणजे हुमा कुरेशी शेवट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तिनं राजकुमार राव आणि सिकंदर खेरसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटातील हुमा कुरेशीचा अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती.


दरम्यान, 'डबल एक्सएल' या चित्रपटात हुमासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी जगातील महिलांसोबत बॉडी शेमिंगबद्दल बोलताना दिसत आहेत. पाहिलं तर बॉडी शेमिंग ही अशी समस्या आहे, ज्याचा त्रास प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी सहन करावा लागतो. जास्त बारीकपणामुळे असो किंवा लठ्ठपणामुळे, याचा त्रास सहन प्रत्येकाला सहन करावा लागतो.