नवी दिल्ली : 'गॅंग्स ऑफ वासेपुर' गर्ल हुमा कुरेशी आपल्या लुक्स आणि दिलखेच अंदाजामुळे चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. आपलं असंबंध बोलणं आणि ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असणारी असणारी हॉट अभिनेत्री हुमा कुरेशी पुन्हा ट्रोल झालीयं. गुरुवारी तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर तिला ट्रोल करण्यास सुरूवात झालीयं. एका बाजुला महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध #MeToo मोहिमेतून आवाज उठवत असताना त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे हुमाच्या फोटोखाली अश्लाघ्य कमेंट्स पाहायला मिळताहेत.


व्हाईट कोट फोटो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 हुमाचा जो फोटो सध्या चर्चेत आहे त्यामध्ये तिने सफेद रंगाचा कोट घातलायं. पण तो कोट तिने उलटा घातलाय.


यामुळे तिची पाठ दिसतेयं. या फोटोत हुमा खूपच सुंदर दिसतेय. तिच्या लुक्ससोबतच तिचे हावभावही घायाळ करणारे आहेत. 


काय म्हणतात लोकं ? 


 हुमाला ट्रोल करणारी अधिकतर लोकं बहुदा एकाच समुदायातील आहेत.


हुमाला आपल्या धर्माचं पालन करायला हवं तर काहीजण तिला धर्म बदलण्याचा सल्ला देत आहेत.


याशिवाय काही मज्जा घेणाऱ्या कमेंट्सही पाहायला मिळतायत. काहीजणांनी तिच्या डोळ्यांची मांजर आणि वाघिणीच्या डोळ्यांशी केलीयं. तर काहींनी तिला कोट सरळ घालण्याचा सल्लाही दिलायं.