पती राज कौशलच्या मृत्यूनंतर मंदिरा बेदीची पहिली भावूक पोस्ट
मंदिरा बेदी भावूक...
मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं पाच दिवसांपूर्वी निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर मंदिरा पूर्णपणे कोलमडली आहे. तर बेदी आणि कौशल कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. राज कौशल यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. आता पाच दिवसांनंतर खुद्द मंदिरा बेदी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. याआधी त्यांनी सोशल मीडियावरून स्वतःचा फोटो काढला होता.
राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिराने स्वतःचा फोटो हटविला. त्याआधी मंदिराचा सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसत होता. आता तिच्या सोशल मीडियावर काळ्या रंगाचा फोटो आहे. ज्यामुळे आपण अंदाज लावू शकतो ती सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत आहे. आता देखील मंदिराने पतीसोबत व्यतीत केलेल्या गोड आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.
आता देखील तिने पतीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये हार्टब्रेक असलेला इमोजी ठेवला आहे. मंदिराची ही पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे. तिच्या या पोस्ट अनेकांनी कमेन्ट देखील केल्या आहे.
राज यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. आपल्या करिअरमध्ये 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'एंथनी कौन है या चित्रपटांमध्ये दिग्दर्शन केलं आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे.