मुंबई : प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ६' शेवटच्या भागाचे प्रक्षेपण पार पडले. आता पर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सने या चॉट शो मध्ये आपल्या आयुष्याबद्दलचे खुलासे केले. कॉफी विथ करणच्या शेवटच्या भागात अभिनेत्री करिना कपूर अणि प्रियंका चोप्रा उपस्थित होत्या. अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेली प्रियंका आणि बॉलिवूडची बेबो यांच्याशी करणने संवाद साधला. शोमध्ये तारकांना त्यांच्या खाजगी आयुष्यावर प्रश्न विचारण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रश्न-उत्तरांच्या या शोमध्ये करणने बेबोला एक प्रश्न विचारला की तूला प्रियंका सारखे हॉलिवूडमध्ये काम करायला आवडेल का? तेव्हा करिनाने याप्रश्नाला स्पष्टपणे नकार देत उत्तर दिले 'माझे संपूर्ण कुटुंब भारतात आहे, माझे प्रेम, माझा मुलगा, सगळ्या गोष्टी भारतात उपलब्ध असताना तिकचे जाण्याची काहीच गरज मला वाटत नाही.'


प्रियंका खूप महत्त्वकांशी आहे. प्रियंकाने बॉलिवूड त्याचप्रमाणे हॉलिवूडमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. मी तिच्या सारखी महत्त्वकांशी नाही असे वक्तव्य करिनाने केले. करिना-प्रियंका 'ऐतराज' सिनेमात एकत्र झळकल्या होत्या.