मुंबई : टेलिव्हिजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच तिला वेगवेगळ्या चित्रपटातून विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. २०१९ या वर्षात मौनी रॉयचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आपल्या करियरच्या सुरूवातीलाच इतक्या लवकर चागंल्या भूमिका मिळतील याची अपेक्षा नसल्याचं मौनीने म्हटलंय. गेल्या वर्षी 'गोल्ड' चित्रपटातून मौनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षात मौनीचे ३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'रोमियो अकबर वॉल्टर' १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'मेड इन चायना' ३० ऑगस्ट रोजी तर वर्षाच्या शेवटी 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मौनीने 'आगामी तीनही चित्रपट अतिशय मनोरंजक आहेत. तीनही चित्रपटातील माझ्या भूमिका अतिशय वेगळया आहेत. या चित्रपटांचा मी भाग असल्याचा मला आनंद असल्याचं' तिने माध्यमांशी बोलताना सांगितलं.


'मी टीव्ही अभिनेत्री असल्याचा मला गर्व आहे. मी आज जे काही आहे ते त्यामुळेच आहे. आगामी चित्रपटांचा भाग असल्याचा मला आनंद आहे परंतु, टीव्ही किंवा वेबवर काही मनोरंजक असेल तर तिथे काम करायला मला नक्की आवडेल. मला एकाच प्रोजेक्टसाठी वर्षभर, १० महिने काम करायचं नाही. जर मला तीन-चार महिन्यांचा प्रोजेक्ट मिळाला तर तो मी करेन' असं तिनं सांगितलं. मौनीने नुकताच फॅशन डिझायनर पायल सिंघल हीच्या शोमध्ये शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. या शोमधल्या मौनीच्या लूकला अनेकांनी मोठी पसंती दिली आहे.