मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर त्यांच्या जबरदस्त एनर्जी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी ओळखले जातात. एवढंच नाही तर अनिल कपूर यांचा बॉलिवूडमधल्या अनेक तरूण कलाकारांशीही चांगले संबंध आहेत. अनेकदा ते मी सोनमचे वडील वाटत नसल्याचंही मजेशीरपणे बोलतात. अनिल कपूर आणि सोनम ही बाप-बेटी जोडी त्यांच्या फ्रेन्डली नात्यासाठीही प्रसिद्ध आहे. पण अनेकदा अनिल कपूर यांच्या काही गोष्टींमुळे सोनमला मात्र सांभाळून घ्यावं लागतं. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटाच्या प्रोमोशन वेळी असाच प्रकार घडला. प्रोमोशनच्यावेळी अनिल कपूर यांचे कोणीतरी कौतुक केले आणि त्यांनी चक्क स्टेजवर थेट रॅम्प वॉकच सुरू केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटातून अनिल कपूर आणि सोनम ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी अनिल कपूर आणि सोनम अनेकदा एकत्र असतात. एका इव्हेंटवेळी सोनमने पत्रकारांना असे प्रश्न विचारू नका असं सांगितलं. त्यावर अनिल कपूर यांनी सोनमच्या बोलण्याचा अर्थ समजून 'मला माहित आहे माझ्यामुळे माझी मुलगी गोंधळून जाते. पण तिला हे सारं सहन करावंच लागेल. तसं ती हे सगळं अनेक वर्षांपासून सहन करत आहे' असं गंमतीने म्हटलं. पण त्यांनी सोनमचं कौतुक करत तिच्याकडून रोज काहीतरी नवीन शिकत असल्याचं सांगितलं. 


सोनम अतिशय हुशार, खरेपणाने वागणारी, प्रेमळ आणि तितकीच धाडसी मुलगी आहे. तिच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचं अनिल कपूर यांनी सांगितलं. तरूणांकडून नवीन पिढीबद्दल शिकायला हवं. मी अनेक गोष्टी ऐकतो आणि त्यांचं निरिक्षण करतो. ज्या गोष्टी चांगल्या असतात त्या मी आत्मसात करतो. अशा अनेक चांगल्या गोष्टी मी सोनमकडून शिकलोयं त्यांनी इव्हेंटवेळी सांगितलं. 


शैली चोप्रा धर दिग्दर्शित 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून पहिल्यांदाच रिअल लाइफ वडील-मुलीची जोडी रिल लाइफमध्येही त्याच भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूर, सोनम कपूर यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात जुही चावलाही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.